Wednesday, October 16, 2019

These are some of my video creations

1. Enter a locked car
2. Don't use a phone while crossing a railway track

 

Thursday, September 26, 2019
कॅमेर्‍याचा सेन्सर आणि त्याचे महत्व

कॅमेरा बनवणार्‍या कंपन्या सतत आमचा कॅमेरा जास्त मेगापि़क्सेलचा आहे त्यामुळे त्यवर काढलेले फ़ोटो कसे उत्तम येतात हे सांगत असतात .
पण मेगापि़क्सेलपेक्षा मह्त्वाचा असतो तो sensor size त्यामुळेच १० मेगापि़क्सेलच्या DSLR वर
काढलेला फ़ोटो हा १६ मेगापि़क्सेलच्या फ़ोन कॅमेर्‍याने काढलेल्या ओटोपेक्षा चांगला असतो.
कारण एकच sensor size.

Sensor  size का महत्वाचा असतो ?
कॅमेर्‍यात पूर्वी फ़िल्म वापरायचे त्याऐवजी आता image sensors असतात आणि त्याच्या आकारवरच फ़ोटो कसा येइल ते ठरते
image sensor मधे लक्षावधी photosites असतात ज्यावर लेन्समधुन काय दिसते याची माहिती साठवली जाते. म्हणजेच सेन्सर मोठा असेल तर त्यावर अर्थातच जस्त माहितीटिपली आणि साठवली जाते आणि फ़ोटो अधिक चांगले येतात

Sensor  size comparison


Sensor size comparison


या फ़ोटोंवरुन नक्की समजते कि sensor size किती मह्त्वा्चा आहे.


Sunday, September 15, 2019

अंधश्रद्धा

पितृपक्षात कोणतेही शुभकार्य करत नाहित ,नविन खरेदी करत नाहित . 
का ?
तर म्हणे तो काळ वाईट असतो ,

कारण या काळत तुमची पितरे जेवायला येतात .
आता मला सांगा पितरे म्हणजे तुमचे पूर्वज येणार असतील, तर त्यात वाईट काय आहे ?

बर आदल्या दिवसापर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरातच असतो
त्या सुखकर्त्याने तुम्हाला भरपूर आशिर्वाद दिलेला असतो.
तरीपण हा काळ वाईट का ?
माझ्या मते हि फ़क्त अंधश्रद्धा आहे , बाकि काही नाही

Friday, March 03, 2017

बॅंकेतून पैसे काढण्यावरील बंधने

काही खाजगी बॅंकांनी पैसे काढण्यावर बंधने घातली आहेत.
थोड्या दिवसांनी सरकारी बॅंका सुद्धा अशीच बंधने घालतील.
महिन्यात ४ वेळाच पैसे काढता येतील त्याहुन जास्त वेळा काढल्यास प्रत्येक वेळी रु १५०/= दंड होइल.

माझ्या खात्यातील पैसे माझे आहेत आणि माझ्या कष्टाचे आहेत.
मला लागतील तसे मी पैसे काढतो त्यावर बंधन का?
हा प्रश्न मनात येतो कारण बॅंका म्हणतात की थे बंधन काळा पैसा रोखण्य़ासाठी आहे
आणि कॅशलेस व्यवहार वाढावे म्हणून आहे
बरेच लोक म्हणतात की हे बरोबरच आहे कारण त्यांची कल्पना झाली आहे की
रोख पैसा म्हणजे काळा पैसा आणि काळा पैसा बाळगणारा देशद्रोही.
म्हणजे चार वेळा पैसे काढणारा देशभक्त आणि पाच वेळा पैसे काढणारा देशद्रोही
भारी लॉजीक आहे.
मला गरज आहे तेव्हढेच पैसे मी काढत असेन तर त्यात चूक काय आहे.
फ़क्त ४ वेळाच पैसे काढता येतील अन्यथा रु.१५०/= दंड याचे खरे कारण आहे बॅंकांना काहीतरी करुन तुमच्या कडुन पैसे उकळायचे आहेत एव्हढेच......Thursday, November 17, 2016

१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न  
१.राजकारणि आणि सरकारी अधिकारी वर्ग लाच मागणे बंद करतील का?
२.राजकिय पक्ष निवडणुकित नोटांच्या ऐवजी धनादेश वापरतील का?
३.उद्योगपती आणि राजकारणि सर्व प्रकारचे कर इमानदारीने भरतील का?
४.कोणत्याही  कामासाठी नोकरशहा पैसे खातात हे बंद होइल का ?
५.बांधकाम क्षेत्रात बदल होउन बिल्डर लोक नोटा देउन बांधकाम नियमावलिला बगल देणे बंद करतील का ?
६. सिग्नलला लपून सामान्य नागरिकांना   दंडाचा धाक दाखवून पैसे उकळणारे  पोलिस चौकात उभे राहुन वाहतुक नियंत्रण करतील का?  
७.दंडाचा धाक दाखवून पैसे उकळण्य़ाऐवजी पोलिस पावती फ़ाडतील का ?
८. याचबरोबर सतत वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक शिस्तीत वाहने चालवतील का? सतत पोलिसांना नावे ठेवण्यात अर्थ नाही आपणही नियम पाळलेच पाहिजेत
९. बहुतेक राजकारणि लक्षावधी रुपयांच्या गाडीतुन हिंडताना दिसतात ,मोठ्या बंगल्यात राहतात पण कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करतान दिसत नाहित हे थांबेल का ?


हे थांबले नाही तर कोणत्याही नोटा काळ्याच होणार Thursday, August 18, 2016

ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत- साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधु # Rio Olympics #Sakshee Malik # PV Sindhu

झोंबरे वास्तव
ज्या देशात कुंभमेळ्यातील भुक्कड साधूंवर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त खर्च होतो , त्या देशाने खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा ठेवु नये.
खेळात भाग घेणे आणि प्रेक्षकांची मने जिंकणे हे पदकापेक्षा जास्त महत्वाचे आहे असे ज्या देशात सांगितले जाते त्या देशाला पदके कशी मिळणार ?
ज्या देशातील क्रिडा संघटनांचे प्रमुख कोणताही खेळ न खेळता केवळ त्यांच्या राजकिय संबंधांमुळे वर्षानुवर्षे या संघटनांवर राज्य करतात
आणि
जोपर्यंत या संघटनांवर मरायला टेकलेली म्हातारी गिधाडे बसलेली आहेत तोपर्यंत Olympic मधे आपली प्रगती होणे अवघड आहे.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी दोन मुलिंनी भारताची लाज राखली 
सकाळी साक्षी मलिकने महिला कुस्तीतले पहिले  ब्रॉंझ पदक मिळवले
आणि रात्री सिंधुने सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे.

यात दोघींच्या घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या गुरूंनी दिलेले प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे.
दोघींच्या जिद्दीला सलाम