Thursday, March 26, 2009

आपल्या कुटुंबाची वंशावळ तयार करा Make your Family Tree

आपल्या कुटुंबाची वंशावळ तयार करा



तुमच्यापैकी कीती जणांना तुमच्या आजोबांच्या किंवा पणजोबांच्या आधिच्या पि्ढयातील व्यक्तींची नावे माहीत आहेत आहेत? दहापैकी नऊ जणांना उत्तर ठाउक नसणार.
तुम्हाला जर तुमची
वंशावळ करायची असेल तर ................................................................................................................ पुढे वाचा

असाच प्रश्न लंडंन मधील एका चौकडीला पडला आणि त्यांनी केवळ स्वत:पुरता तो न सोडवता, तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी सोडवलाय. त्या वेबसाईट्चे नाव आहे www.kindo.com .
वेबसाइट वापरावयास अतिशय साधी आणि सोपी आहे.


किंडो.कॉम हि वेबसाइट ओनलाइन फॅमिली ट्री बनवून देणारी एक वेबसाइट आहे. अगदी काही मिनिटांतच यात फॅमिली ट्री म्हणजे वंशावळ बनवता येते. तुमच्या घराण्याची वंशावळ बनवण्यासाठी आधी आई व बाबांची माहीती द्या आणि सुरुवात करा. पुढे पुर्ण फॅमिली ट्री तुम्ही स्वतःच बनवु शकता अथवा इतर नातेवाइकांना या वेबसाइटवर आमंत्रण देउ शकता.

यात तुम्हाला फोटो, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादी गोष्टी नमूद करण्याची सोय देखिल केलेली आहे. यात रक्त गट, डी एन ए, पत्ते, फोन नंबर इत्यादी महत्त्वाच्या बाबीही साठवुन ठेवता येतात.

फ्लॅश मध्ये बनविलेली असल्या कारणाने या साईटवर फेरफटका मारणे हा एक सुखद अनुभव आहे. फॅमिली ट्री कितिही मोठा झाला तरी हरकत नाही. येथे असलेल्या झूम इन व झूम आऊट या पर्यायांचा वापर करुन पुर्ण वंशावळीतून सहजपणे वावरता येते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वंशावळ सर्व जगासाठी खुली न करता केवळ तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांसाठीच खुली ठेवता येते.

सध्याच्या जगात जिथे लोक एक्-मेकांपासून दुरावत चालले आहेत तिथे कुटुंबातील सर्वांनाच एकत्र बांधुन ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न नक्किच उल्लेखनिय आहे.

No comments:

Post a Comment