राजकारण आणि काळा पैसा
आपल्याला स्वातंत्र्य मिळून साठाहून अधिक वर्षे होवून गेली
तेंव्हापसून ते आजपर्यंत आपण राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत.
कोणि हजार घेतले असतिल तर कोणि कोटी
१९४८ सालापासून आजपर्यंत किती पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमावला असेल याचे माझे एक गणित आहे.
आपल्या देशात आपल्यावर सत्ता गाजवणारे मंत्री ,खासदार ,आमदार,नगरसेवक,जिल्हापरिषद सद्स्य ,वेगवेगळ्या समीत्यांचे आणि उपसमीत्यांचे सद्स्य असे किमान दहा हजार तरी राजकारणी असतील.
आपण बघितलेल्या,ऐकलेल्या, वाचलेल्या आणि कोर्टात क्वचितच सिद्ध झालेल्या गोष्टितून एक नक्कि आहे कि राजकारणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने प्रचंड प्रमाणावर पैसा कमावतात.
क्वचित कोणि असतील सुद्धा धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ ....पण हे नियम सिद्ध करणारे अपवादच ...
आपण एक गणित मांडूया
आता असं बघा
या दहा हजारांनि दरवर्षी फक्त एक लाख कमावले किंवा खरेतर खाल्ले आहेत असे समजू.......
किती झाले?????????????
ती शून्ये मोजताना दम लागतोय
असे गेली साठ वर्षे.... म्हणजे किती झाले???????????
बापरे एवढे !!!! म्हणजे किती ???????????
माझे तर डोकेच चालत नाही
No comments:
Post a Comment