Sunday, August 29, 2010

याला उत्तर काय ?

याला उत्तर काय ?
सहजच चाललेल्या गप्पांच्या ओघात एका मित्राने दोन घटना सांगीतल्या 
 प्रायमरी तल्या एका शिक्षिकेने  मुलांना निबंध लिहायला सांगीतला .
विषय होता मला काय /कोण व्हावयाचे आहे आणि देवाकडे तुम्ही काय मागाल.
सायंकाळी घरी गेल्यावर त्या एकेक नि्बंध तपासत होत्या ्तपासून झाल्यावर त्यांनी बाजूला ठेवलेला एक निबंध पुन्हा वाचायला घेतला ,त्याचे पती जेंव्हा घरी आले आणि त्यांनी बायकोला विचारले अग का रडते आहेस ? न बोलता बायकोने ती वही नवर्‍याच्या हातात ठेवली म्हणाल्या हे  वाचा जरा माझ्या एका विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध आहे
" देवा मला टिव्ही कर मला टिव्हीची जागा घ्यायची आहे त्याच्यासारखे व्हायचे आहे  म्हणजे माझी मला एक जागा मिळेल घरातले सगळे माझ्या अवती भवती असतील, मी काय सागतोय त्याकडे कान देउन ऐकतील मी बोलत असताना मला कोणीही थांबवणार नाही टिव्हीकडे जसे सगळे कायम लक्ष ठेउन असतात तस्च माझ्याकडे पण लक्ष देतील बाबा अगदी खूप दमून आले तरी पण माझ्यासमोर बसतील अगदी न कुरकुरता अणि माझी आई काही कारणाने त्रासली असेल ,कंटाळली असेल तरीपण माझ्याजवळ असेल आणि माझे भाउ बहीण माझ्याजळ बसण्यासाठी भांडतील आणि घरातले सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेउन माझ्यासाठी वेळ देतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी माझ्यामुळे घरातले सगळे आनंदी होतील.
देवा मला अजून काही नको मला टिव्ही कर मला सगळे मिळेल
हे वाचून नवरा म्हणाला " बिच्चारा ! कसे आईवडील असतात एकेक! बापरे"
बाई नवर्‍याकडे बघून म्हणतात "आपल्याच मुलाने लिहीलाय हा निबंध"

दुसरी घटना सुद्धा एका शाळेतीलच आहे
मुलांना शिक्षक विचारतात .................
तुम्हाला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे 
कोणाला पायलट व्हायचे असते कोणाला इंजीनीअर, कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, तर कोणाला कारखाना काढायचा असतो ..प्रत्येकाला काहीतरी  व्हायचे असते एक मुलगा मात्र जे सांगतो ते ऐकून शिक्षक थक्क होतात.
तो मुलगा म्हणतो "मला व्हिलन व्हायचे आहे"
शिक्षक भांबावतात पण विचारतात "काय रे बाबा काय डोकं ठिकाणावर आहे ना?
मुलगा " सर ,कोणत्याही सिनेमात अख्खा पिक्च्रर संपेस्तोवर 
व्हिलन मज्जा करत असतो आणि हिरोची मात्र धुलाई होत असते. एव्हढेच कशाला रामायणात सुद्धा रामाला कायम त्रास आहे आणि रावण तर काय मजाच करत असतो .सीतेला पळवून नेतो तिला त्रास देतो. एव्हढा दुष्ट असून सुद्धा मेल्यावर स्वर्गात जातो कारण त्याला रामाने म्हणजे देवाने मारलेले असते"
 समाजाची चूक का आईवडीलांची चूक ?
बरोबर काय आणि चूक काय कोणी आणि कसे ठरवायचे ?

5 comments:

  1. वा छान.
    यावर जरुर चर्चा झाली पहिेजे.

    ReplyDelete
  2. All parents should read and learn something from this.

    ReplyDelete
  3. त्या मूलासारखे मला कोणी विचारले त्तर मी म्हणीन मला देवळाच्या समोर विकायला ठेवलेला नारळ व्हायला आवडेल म्हणजे लोक मला विकत घेउन देवासमोरच्या प्रवेश दाराने आत येउन देवासमोर ठेवतील. थोडया वेळाने पुजारी मागच्या दाराने मला नारळवाल्याला विकतील व अशा रितिने माझ्या देवाभोवती पूढील दाराने आत व मागच्य़ा दाराने बाहेर अशा प्रदक्षीणा होतील व मला देवासमोरचा व देवामागचा बाजार बघायला मिळेल.
    मला मोबाइल फ़ोन व्हायला आवडेल कारण मग सगळे मला घट्ट तोंडाजवळ ठेवतील व जवळ्च्या लॊकांकडे दुर्लक्ष करुन दूरदूरच्या लोकांशी तासन तास गप्पा मारतील.

    ReplyDelete