Wednesday, February 25, 2015

माननिय छगन भुजबळसाहेब तुमचा सल्ला हवा आहे

http://www.loksatta.com/mumbai-news/

भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?

आजच्या लोकसत्तेतील बातमी

 माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांपुढील अडचणी आता वाढतच असून तब्बल २६५३ कोटींची मालमत्ता असल्याच्या आरोपप्रकरणी खुली चौकशी करण्यास शासनाने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी दिली आहे.

दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
नाशिक येथे चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, राम बंगला, गणेश बंगला, येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला, दिंडोरीत १०० वायनरीसाठी एकर भूखंड, वरळीत सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट, चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालये
माहिम येथे फ्लॅट, नवी मुंबईत दुकाने, १०० कोटींची चित्रे व इतर पुरातन वस्तू, जुहूतील वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट, इंडोनेशियात खाणी, नाशिक येथे वीज कंपनी, शिलापूर येथे १५ एकर भूखंड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा अडीचशे एकर भूखंड, साखर कारखाना
साडेचारशे एकरवर भुजबळ वाइन्स, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे खारघर येथे २५ एकर भूखंड, नीश इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचे दादर परिसरात व्यापारी इमारती, सांताक्रूझ येथे निवासी इमारत, लोणावळा येथे ६५ एकर भूखंड, येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे २६ व ६५ एकर भूखंड, उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.


भुजबळ्साहेब  तुमच्या वेबसाईट्वर ( http://www.chhaganbhujbal.org/p2.html    )
लिहील्याप्रमाणे "तुमचे  बालपण अतिशय हलाखीत गेले घरची परिस्थीती अत्यंत गरिबीची होती आणि  तुमच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे म्युनिसिपल मार्केट मधील भाजीचा एक गाळा होता."
नंतर आपण शिवसेनेत गेलात, मुंबईचे महापौर झालात, आमदार झालात.

महाराष्ट्राच्या राजकारणातही आपण खुप नाव कमावले आहे. आधी मंत्री नंतर उपमुख्यमंत्री झालात,
अत्यंत दैदिप्यमान कारकिर्द आहे तुमची.
दरम्यानच्या काळातील आपले समाजकार्यही सर्वश्रुतच आहे.शिक्षणक्षेत्रातही आपले नाव मोठे आहे.

मात्र आजच्या लोकसत्तेतील ही बातमी वाचुन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे,खरे म्हणायचे तर सल्ला विचारायचा आहे.
आपण जर  हे वैभव कसे मिळवायचे ते सर्वसामांन्यांना  सांगीतले तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची  गरिबी दूर होईल, सर्वत्र आनंदी आनंद होइल .
देवांच्या फोटोबरोबर आपलाही फोटो घराघरात दिसेल .


7 comments:

  1. Well said Sir. But he has been an Opportunist, and opportunities don not present themselves to everyone equally.... True to the name, This 'Armstrong' has been on the Steroids of Power, but sadly, unlike Lance he cannot be shamed publicly as Politics has made him Shameless.
    Ordinary citizens cannot be as shameless, hence they cannot benefit from This Armstrong !

    ReplyDelete
  2. Yes Mr. Sanjy, Mr. Bhujbal,s reply will change life of young generation.

    ReplyDelete
  3. Why only Bhujabal..let us learn from all the politicians who are defeated today...Supriyatai is also not exception..Appoint FBI ...NO local agency... investigate & culprits should be Hanged on Shanivarwada ...entire wealth should be confiscated and used for building corruption free nation. Enforce Law & Order which is on paper only..No Tax rise is required as these dirty politisians have accumulated so much welth..one cannot imagine...Sanjay you have put finger on right point..!

    ReplyDelete
  4. Sanjay well said. But Chhagan Bhujbal will be busy advising the Current Ministers how to amass so much wealth. So General Public will have to wait forever.

    ReplyDelete
  5. सगळे राष्ट्रवादी एका माळेतील मणी 🙊🙉🙈

    ReplyDelete
  6. तुम्ही फार टोचून बोलता बुवा ! नुस्त्या गाळ्यावर भागलं का ? मग द्राक्षाचे मळे आले, जमिनी आल्या. मग शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव काम करणं आलं . सगळं आलं . पण एक बाकी खरं गरीबीतला आनंद काही वेगळाच ! जोशीसाहेब या एकदा नाशकात बंगल्यावर ! बोलु आपण ! -

    ReplyDelete
  7. भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता

    नाशिक येथे चंद्राई बंगला,
    भुजबळ पॅलेस,
    भुजबळ फार्म,
    राम बंगला,
    गणेश बंगला,
    येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला,
    दिंडोरीत १०० वायनरीसाठी एकर भूखंड,
    वरळीत सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट,
    चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालय
    माहिम येथे फ्लॅट,
    नवी मुंबईत दुकाने,
    १०० कोटींची चित्रे व इतरपुरातन वस्तू,
    जुहूतील वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट,
    इंडोनेशियातखाणी,
    नाशिक येथे वीज कंपनी,
    शिलापूर येथे १५ एकर भूखंड,
    आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा अडीचशे एकर भूखंड,
    साखर कारखाना
    साडेचारशे एकरवर भुजबळ वाइन्स,
    देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे खारघर येथे २५ एकर भूखंड,
    नीश इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचे दादर परिसरात व्यापारी इमारती,
    सांताक्रूझ येथे निवासी इमारत,
    लोणावळा येथे ६५ एकर भूखंड,
    येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे
    २६ व ६५ एकर भूखंड,
    उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.
    एकुण संपत्ती 2⃣6⃣5⃣3⃣ कोटी

    ReplyDelete