Monday, May 30, 2011

चिन्मय गणाधिश टोप-संभापूर कोल्हापूर

चिन्मय गणाधिश टोप -संभापूर कोल्हापूर



कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक प्रचंड गणेशमूर्ती दिसते .
पुण्याहून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ हायवेपासून अंदाजे दिड किमी वर हा गणपती आहे हायवेवरून तो दिसतोच. पण या वेळी मात्र जवळून दर्शन घेवून आलो . येथे पार्किंगची उत्तम सोय आहे. साधारण पन्नास पायर्‍या चढून जावे लागते परंतू बरोबर वयस्क किंवा अपंग असतील तर वरपर्यंत गाडी नेता येते.चिन्मय मिशनने इथला परिसर अतिशय स्वच्छ ठेवला आहे




साधारण ८०० टन वजनाची ही मूर्ती ६१ फूट उंच आहे आणि २५ फूट उंचिच्या "ध्याननिलयम" सह जवळ जवळ ८५ फूट उंच आहे एवढा प्रचंड आकार असूनसुद्धा मूर्ती अतिशय सुबक आहे. चिन्मय मिशनने कर्नाटकातून ५० कारागीरांकडून १८ महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे. 
मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढचा उजवा हात वरदहस्त आहे .मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात मोदक आहे.

Tuesday, January 25, 2011

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सर्व वाचकांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Saturday, January 15, 2011

गूगल ग्रॅव्हिटी ट्रिक

गूगल ग्रॅव्हिटी ट्रिक एक गंमत
 तुमच्या ब्राउझर च्या सर्च विंडोमधे "Google Gravity"  असे टाईप करा आणि I am feeling lucky वर क्लिक करा आणि मजा बघा
किंवा खालील लिंक् वर क्लिक करा आणि काय गंमत होते ते बघा.

http://mrdoob.com/projects/chromeexperiments/google_gravity/

Tuesday, December 28, 2010

दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे

दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे!!
दादोजींचा पुतळा हलवणे बरोबर आहे का चूक या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
कारण एक सामान्य माणूस म्हणून मला असे वाटते की प्रत्येक विषयात बोलायचा आपल्याला अधिकार नाही.
पण पुतळा हलविल्यानंतर काल आमच्या महानगरपालिकेत  माननियांनी जो राडा केला ते बघून ह्या असल्या लोकांना आपण निवडून दिलेय ह्याचे नक्कीच दुःख   होतेय.
मोड्तोड करून ह्यांना काय मिळाले हेच कळत नाहीये.
एकमेकांच्या ऑफीस ची मोड्तोड करून प्रश्न सुटेल असे ह्यांना वाटतेय का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जनतेची उस्फूर्त प्रतिक्रिया होती.
मग काय जनतेने ह्यांना महानगरपालिकेत राडा करायला, काचा फोडायला,महापौरांची खुर्ची लाथा मारून तोडायला सांगीतले होते?आणि कधी?

माननिय नगरसेवक असेही म्हणाले की भगतसिंहांनीच सांगीतले होते की सरकारला जनतेचा क्षोभ जर ऐकू येत नसेल तर सरकारच्या कानापाशी स्फोट करायला लागतो.
माझी माननियांना विनंती आहे की तुम्हाला काय हवे ते करा पण स्वतःची तुलना भगतसिंहांशी करू नका ते फारच म्हणजे फारच महान होते.
मला या सगळ्या घटनांमुळे काही प्रश्न पडले आहेत.
पुढील काही दिवस ह्या प्रश्नांचा भुंगा मला छळणार आहे असे दिसतेय

उस्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
भावना दुखावणे म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
गोंधळ माजवून आणि राडा करून आणि सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून कोणाचा फायदा होतो?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  पुढे काय होणार?

Saturday, December 18, 2010

नविन सायकल घेताय? मग हे जरूर वाचा........

नविन सायकल घेताय मग हे वाचा...
मी गेली तीन वर्षे नियमीत सायकल चालवत आहे आणि सध्या सायकलींना बरे दिवस आले आहेत असे वाटावे एव्ह्ढ्या सायकली पुण्याच्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत.त्यातसुद्धा साधारणपणे मध्यमवयीन स्त्री पुरुषांचे प्रमाण जास्त दिसते.पूर्वी सायकल ही घरात वर्षानुवर्षे वापरली जाणारी गोष्ट होती आणि स्वयंचलीत वाहने कमी असल्यामुळे सायकल हेच कामावर जाणे ,कॉलेजमधे जाणे यांसाठी मुख्य साधन होते.मी कॉलेजमध्ये असताना रॅलेची साधी सायकल मला वडिलांनी दिली होती आणि मला तिने बरीच वर्षे साथ दिली, आणि ती जुनीच होती.
आता तसे नाहीये सायकलचा मुख्यत्वेकरून वापर हा व्यायाम म्हणून होतो पण मग कोणती सायकल घ्यावी असा प्रश्न बह्तेकांना पडतो कारण दुकानात खुप प्रकाराच्या सायकली असतात आणि कोणती घ्यावी हे न कळल्यामुळे आपला खीसा बघून किंवा दुकानदार सांगेल ती सायकल घेतली जाते.
मला असे वाटते की नविन सायकल घेण्यापूर्वी सायकल संबंधी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे ….....
सायकलचा वापर
१. रेस चालवणे किंवा Long distance cycling
२. व्यायाम किंवा फिटनेस करता कोणतीही सायकल चालते
३.कामावर जाण्यासाठी
सायकलचे प्रकार
सायकलचे ४ मुख्य प्रकार आहेत
.माउंटन बाइक



 ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१.जाड आणि रूंद टायर ज्यांचा उपयोग डोगराळ रस्त्यांवर तोल सांभाळण्यासाठी होतो
२.जा्ड फ्रेम
३. दोन्ही किंवा फक्त पुढच्या चाकाला शॉक अबसॉर्बर


.हायब्रीड बाइक

 डांबरी रस्त्यांवर चालविण्यासाठी किंवा ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१. वजनाला हलकी
२. मध्यम आकाराचे टायर
.रोड बाइक

 सायकल शर्यतींसाठी किंवा long distance सायकलींग साठी
वैशिष्टे
१. वजनाला अतिषय हलकी
२. पातळ आकाराचे टायर
३. खालच्या बाजूला वळलेले विशीष्ट आकाराचे हॅंडलबार

 ४.रोडस्टर बाइक 



रोडस्टर म्हणजे आपण जी नेहेमी चालवत आलो ती सायकल
वैशिष्टे
 मड्गार्ड, कॅरीअर घंटा लावता येते ,कमी किंमत आणि
मुख्य म्हणजे दणदणीत आणि मजबूत असते .


दुकानात आपल्याला अनेक प्रकारच्या सायकलींचे पर्याय  उपलब्ध असतात आणि बहुतेक दुकानदार सायकल खरेदी करण्यापूर्वी Ride  घेउन देतात आणि सायकल खरेदी करण्यापूर्वी नक्कीच चालवून बघावी.
 
 
सायकल खरेदी करण्यापूर्वी  खाली दिलेल्या वेबसाईटना जरूर भेट द्या
 
 http://www.bikeszone.com
www.cyclists.in/
www.sheldonbrown.com/

Wednesday, November 03, 2010

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

ब्लॉगला भेट देणार्‍या सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

Wednesday, October 06, 2010

बिग बॉस,पाकीस्तानी कलाकार आणि आपण

आपल्या देशाला त्रास देण्याची एकही संधी न सोडणार्‍या ,आपल्यावर अतिरेकी हल्ले करणार्‍या आणि भारतात अशांतता माजेल याच्याच प्रयत्नात असलेल्या पाकीस्तानातील दोन भंगार कलाकार बिग बॉस मधे हवेतच कशाला!!! 

त्यांना इथे आणून आमचे मनोरंजन होईल असे बिग बॉस च्या निर्लज्ज निर्मात्यांना वाटत असेल ... तर त्यांचा TRP खाली आणणे हे आपल्या नक्कीच हातात आहे.

नालायक पाकिस्तानी येथे नकोत पण त्याबरोबर कसाब तसेच टायगर मेमन सारख्या देशद्रोही अतिरेक्यांचे वकीलपत्र घेणाऱ्या अब्बास काझमी यालाही या कार्यक्रमातून काढले पाहिजे. अब्बास काझमी, हेडलीला मदत करणाऱ्या राहुल भट यांना प्रसिद्धी देणे म्हणजे सर्व भारतीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याप्रमाणे आहे. असे कार्यक्रम पाहणे म्हणजे आपणच देशविघातक प्रवृतींना खतपाणी घातल्या सारखे होणार आहे.
सुरुवात आपण हा कार्यक्रम न पाहून व अशा वाहिनीवर बहिष्कार टाकून करूयात.
 

जयहिंद!!!