Tuesday, November 10, 2015

Happy Diwali



Wednesday, February 25, 2015

माननिय छगन भुजबळसाहेब तुमचा सल्ला हवा आहे

http://www.loksatta.com/mumbai-news/

भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?

आजच्या लोकसत्तेतील बातमी

 माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांपुढील अडचणी आता वाढतच असून तब्बल २६५३ कोटींची मालमत्ता असल्याच्या आरोपप्रकरणी खुली चौकशी करण्यास शासनाने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी दिली आहे.

दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
नाशिक येथे चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, राम बंगला, गणेश बंगला, येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला, दिंडोरीत १०० वायनरीसाठी एकर भूखंड, वरळीत सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट, चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालये
माहिम येथे फ्लॅट, नवी मुंबईत दुकाने, १०० कोटींची चित्रे व इतर पुरातन वस्तू, जुहूतील वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट, इंडोनेशियात खाणी, नाशिक येथे वीज कंपनी, शिलापूर येथे १५ एकर भूखंड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा अडीचशे एकर भूखंड, साखर कारखाना
साडेचारशे एकरवर भुजबळ वाइन्स, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे खारघर येथे २५ एकर भूखंड, नीश इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचे दादर परिसरात व्यापारी इमारती, सांताक्रूझ येथे निवासी इमारत, लोणावळा येथे ६५ एकर भूखंड, येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे २६ व ६५ एकर भूखंड, उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.


भुजबळ्साहेब  तुमच्या वेबसाईट्वर ( http://www.chhaganbhujbal.org/p2.html    )
लिहील्याप्रमाणे "तुमचे  बालपण अतिशय हलाखीत गेले घरची परिस्थीती अत्यंत गरिबीची होती आणि  तुमच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे म्युनिसिपल मार्केट मधील भाजीचा एक गाळा होता."
नंतर आपण शिवसेनेत गेलात, मुंबईचे महापौर झालात, आमदार झालात.

महाराष्ट्राच्या राजकारणातही आपण खुप नाव कमावले आहे. आधी मंत्री नंतर उपमुख्यमंत्री झालात,
अत्यंत दैदिप्यमान कारकिर्द आहे तुमची.
दरम्यानच्या काळातील आपले समाजकार्यही सर्वश्रुतच आहे.शिक्षणक्षेत्रातही आपले नाव मोठे आहे.

मात्र आजच्या लोकसत्तेतील ही बातमी वाचुन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे,खरे म्हणायचे तर सल्ला विचारायचा आहे.
आपण जर  हे वैभव कसे मिळवायचे ते सर्वसामांन्यांना  सांगीतले तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची  गरिबी दूर होईल, सर्वत्र आनंदी आनंद होइल .
देवांच्या फोटोबरोबर आपलाही फोटो घराघरात दिसेल .


Monday, August 11, 2014

पुणे विद्यापिठाचा नामविस्तार नामांतर

पुणे विद्यापिठाचा नामविस्तार करून आता त्याला सावित्रीबाई फुले यांचे  नाव देण्यात आले . ह्या नामविस्तारासाठी किती जणांनी अथक परिश्रम घेतले ते काही दिवसांपूर्वी विद्यापिठाबाहेर आणि गावभर लागलेल्या होर्डींगवरूनच कळले .
श्री शरद पवार साहेबांनी त्याच कार्यक्रमाचे वेळी  सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात  यावे अशी सूचना केली .
या बाबतीत माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार ??
पण काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ पुणे विद्यापिठाचा नामविस्तार आत्ताच्या आत्ता करा नाही तर मी मंत्रीं मंडळाच्या बैठकीस उपस्थीत राहणार नाही म्हणून रुसून बसल्याचे आपण सर्वांनीच टिव्हीवर पाहिले होते .
त्याना होणारे दुःख खरोखरच बघवत नव्हते .(राजीनामा नाही दिला)
खरेतर छगन भुजबळांकडे या दुःखातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग होता. नाशिक मधे असलेल्या त्यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याना सहज देता आले असते.
पण साहेबांनी ही संधी दवडली .
पण काही हरकत नाही अजुनही ते त्याच्या संस्थेला कोणाचे तरी नाव देउ शकतात .
खरेतर महारष्ट्रातील अनेक खाजगी विद्यापिठे नामविस्तारासाठी अजुनही उपलब्ध आहेत
आणि आपल्या देशात राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रासाठी आपले बलिदान देणार्‍या महिलांचा सन्मान होईल .
१.भुजबळ नॉलेज सिटी
२.भारती विद्यापिठ
३. डि. वाय. पाटील विद्यापिठ
४ दता मेघे मेडिकल कॉलेज विद्यापिठ
५. एम जी एम इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
६. विद्या प्रतिष्ठान बारामती
७. प्रवरा इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
 आणि इतर अनेक...............................................
आता तरी मला इतकीच आठवली

नेते हो बघा विचार करा .
निवडणुकीपुर्वी हि संधी तुम्हा्ला उपलब्ध आहे
त्वरा करा
आचार संहिता कधिही लागू होईल




Sunday, October 21, 2012

नवी गुलामगिरी
आपल्या देशावर १५० वर्षे ब्रिटीशांनी राज्य केले , १५० वर्षे आपण गुलामगिरीत काढली.
ब्रिटीश(गोरे) लोक भारतात आले ते व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांनी हळुहळु देशाचा ताबाच घेतला त्यांनी आपले पाणी जोखलं होते अणि"“Divide & Rule” चा वापर करून त्यांनी आपल्यात दुही माजवली आणि आपल्याला गुलाम बनवले. राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी गोरे लोक ठेवले होते पण खालच्या स्तरावर मात्र भारतीय लोकच होते.
 हे असे का झाले कसे झाले हा या लेखाचा विषय नाही त्यावर भरपूर माहिती अनेक जागी उपलब्ध आहे

ब्रिटीश(गोरे) लोक जाउन आता ६४ वर्षे झाली आहेत आणि आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत पण आपण पुन्हा एकदा स्वतःहून एका वेगळ्या प्रकारच्या गुलामगिरी कडे वाटचाल करत आहोत असे मला वाटते
भारतीय लोकांना परदेशी वस्तूंचे आकर्षण आहे हे गोर्‍या लोकांनी ओळखले आहे ,त्यामुळे इथे येऊन सत्ताधारी होवून राज्यकारभार हाकण्यात त्यांना अजिबात रस नाही ते व्यापारी आहेत आणि आपला माल जास्तीत जास्त किमतीला खपवून नफा कमावणे एव्हढाच त्यांचा उद्देश आहे.
यापुढे परकीयांना आपल्यावर आक्रमण करून अथवा युद्ध करून देश ताब्यात घ्यायची गरजच नाही. आर्थिक गुलामगिरी आपण स्वतःहून ओढवून घेत आहोत.
आपण जरा निट विचार केला तर लक्षात येईल की आपण वापरत असलेल्या निम्म्याहून अधिक वस्तू या परदेशात तरी बनवलेल्या आहेत किंवा परदेशी कंपन्यांनी भारतात बनवलेल्या आहेत .
ह्या लेखाचा उद्देश स्वदेशी वापराचा संदेश देणे असाही नाही.
आपल्या घरात असलेल्या बर्‍याच वस्तू परकीय बनावटीच्या असतात टिव्ही ,फ्रिज ,मिक्सर
मोबाईल किंवा लॅंड्लाईन फ़ोन. कॉम्प्युटर. ,गाड्या, दुचाक्या वगैरे...
आपल्याकडे मोबाईल फोन बनतच नाहीत त्यामुळे सर्वच्या सर्व मोबाईल परकीय बनावटीचेच असतात कॉम्प्युटरची आपल्याकडे जुळणी होते त्यातले एलेक्ट्रॉनिक पार्ट परदेशातूनच येतात किंवा भारतात बनत असले तरी परदेशी कंपनीच्या कोलॅबरेशन मधेच बनत असतात
आणि वर उल्लेख केलेल्या वस्तू जरी भारतात बनत असल्या तरीसुद्धा त्यात वापरलेले स्पेअर्स परदेशातूनच येत असतात ….प्रत्येकाने पहिला फोन घेतल्यानंतर या ना त्या कारणाने दोन तिनदा तरी नवा फोन घेतलेला असतोच आणि बरेचसे असे फोन नंतर धूळ खात पडलेले असतात
दर दोन तीन वर्षांनी गाडी बदलण्याची खरेच गरज असते का?
अश्या अनेक वस्तू आपल्याकडे असतात आणि त्यासाठी आपण महागडे परकीय चलन मोजलेले असते

गोर्‍या लोकांनी भारतीय लोकांची ही गरज ओळखून आपल्याला अनेक नावीन्यपूर्ण गॅजेट्स उपलब्ध करून दिली आहेत आणि ठरावीक काळानंतर त्यात जरासे बदल करून नवीन व्हर्जन बाजारात आणले जाते कारण ते एक मार्केटींग गिमिक असते. त्यात फार काही वेगळे असते असे नाही पण नवे आलेय ना?  मग घ्या ते! या वृत्तीमुळे नव्याची खरेदी होते

लहान मुले जशी नवे खेळणे आणले की जुने टाकून देतात तशी आपल्याकडील बर्‍याच जणाची पद्धत झाली आहे या नवे आले की जुने फेका वृत्तीतून बरेच परकीय़ चलन वाया जात आहे असे मला वाटते.
मला एव्हढेच म्हणायचे आहे की ही वृत्ती आपण जर बदलली तर आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहील





Monday, August 06, 2012

बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)

बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)

परवा संध्याकाळी टिव्ही बघत असताना अचानक पुण्यात छोटा बॉम्बस्फोट अशी बातमी दिसली .

चॅनेलवर स्फोटाच्या जागी गेलेले त्यांचे प्रतिनीधी बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत माहिती देत होते आणि टिव्हीवर तिचं तिचं द्रुष्ये दाखवत असतानाच तेथे आलेल्या पोलीस कमिशनर साहेबांना चॅनेलवाले प्रश्न विचारत होते त्याच वेळी एका बाजूला माननियांची गर्दी होऊ लागली.
पोलीस कमिशनर साहेब गेल्यानंतर चॅनेलवाल्यांनी ताबडतोब आपला कॅमेरा आणि माईक त्यांच्याकडे वळविला आणि पुण्यातील माननियांच्या मुलाखती दाखवण्यास सुरूवात केली.

चॅनेल- हा दहशतवाद्यांचा हल्ला आहे असे आपल्याला वाटते का?

माननीय- अं अं

चॅनेल - हा स्फोट कोणी केला असेल असे आपल्याला वाटते?

माननीय- मला असे वाटते की ………………

चॅनेल- आपण पुणेकरांना  काय सांगाल?

माननीय—अं !! अं !! आमच्या पक्षाचा कार्यक्रम इथेच बालगंधर्व मधे होता आणि आपले मा.-अमुक अमुक इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आत असतानाच आम्हाला फोन आला आणि मग आम्ही सर्वच ( मा. अमुक अमुक तमुक तमुक ….नेत्यांच्या नावांची मोठ्ठी यादी…..)धावतच बाहेर आलो आणि आत्ताच आपल्या पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितले आहे की “घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही पुढील तपास चालू आहे आणि पुणेकरांना आमची विनंती आहे कृपया अफवा पसरवू नका ” वगैरे वगैरे

पुन्हा एकदा तेच पाल्हाळ वेगवेगळ्या माननियांनी लावले होते .
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पॉझ आणि पोझ  घेवून अं अं करत बोलत होते प्रत्येकजण आपण आपल्या वरिष्ठांना ही बातमी कशी दिली ह्याची सुद्धा माहीती देत होता.
ह्या मुलाखतीची खरोखरच गरज असते का?
लागोपाठ वेगवेगळ्या माननियांनी तिथे येण्याची खरोखरच गरज होती का?
पोलीस कमिशनरसाहेबांनी मुलाखत दिल्यानंतर माननियांना हे प्रश्न विचारण्याची काही गरज आहे का?
आणि आपण राजकारणात आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला हवेच का??