अण्णा.....
अहो जरा विचार करून बोला
शरद
पवारांसारख्या बुजूर्ग
नेत्यावर एका माथेफिरूने हला
केला या घटनेचा प्रत्येक
राजकीय पक्षाने आणि नेत्याने
निषेध केला.
पण अण्णा
हजारेंना याबद्दल विचारले
असता अण्णांची पहिली प्रतिक्रिया
होती
“ क्या
एकही मारा?" …..एकदाच
मारले?
व्हिडीओ
लिंक http://www.youtube.com/watch?v=xWH4_NxU5E0
काय अण्णा!!
काय बोलताय तुंम्ही!!
अहो पवारसाहेबांबद्दल
तुम्हाला राग असेलही पण हे
जे काय तुम्ही बोललात ते चूकच
आहे. सर्वच
राजकारण्यांबद्दल जनतेच्या
मनात रोष आहे पण म्हणून कोणि
त्यांना मारहाण करायला जात
नाही.
निषेध
करण्याच्या अनेक पद्धती आणि
सर्वमान्य मार्ग आहेतच की.
नंतर तुम्ही
या घटनेचा आता कितीही वेळा
निषेध केलात तरी तुमच्या मनात
काय आहे ते कळलेच.
राळेगणसिद्धीतल्या
दारूडयाला खांबाला बांधून
मारणे वेगळे आहे आणि खरेतर
चूकही आहे.
आणि अण्णा
जनतेने तुंम्हाला मोठेपणा
दिला याचा अर्थ असा नव्हे की
आपण प्रत्येक विषयात आपण
बोलायलाच पाहीजे
मी कायम महात्मा गांधींच्या विचाराने
जाणारा आहे असे तुंम्ही म्हणता
मग हे काय बोलताय?
तुमच्या
प्रतीक्रियेवर शरद पवारसाहेब
बरोबर म्हणाले की "
गांधीवादाची नवी
व्याख्या आम्हाल कळली"
अण्णा
हल्ली प्रत्येक घटनेबद्दल
तुम्हाला पत्रकार आणि सामान्य
लोक तुमचे मत काय असे विचारतात
,तुमचे नाव भारत
भरच काय कदाहित जगभरही झाले
असेल ,अण्णा तुमच्यामुळे
लोकपाल येईल, तुमच्यामुळे
माहीतीचा कायदा आला ,तुमच्यामुळे
ग्रामविकास झाला हे अगदी बरोब्बर.
पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर
तुम्ही मतप्रदर्शन करायला
हवेच का?