Thursday, November 24, 2011


अण्णा..... अहो जरा विचार करून बोला


शरद पवारांसारख्या बुजूर्ग नेत्यावर एका माथेफिरूने हला केला या घटनेचा प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने निषेध केला.
पण अण्णा हजारेंना याबद्दल विचारले असता अण्णांची पहिली प्रतिक्रिया होती
क्या एकही मारा?" …..एकदाच मारले?
व्हिडीओ लिंक http://www.youtube.com/watch?v=xWH4_NxU5E0
काय अण्णा!! काय बोलताय तुंम्ही!! अहो पवारसाहेबांबद्दल तुम्हाला राग असेलही पण हे जे काय तुम्ही बोललात ते चूकच आहे. सर्वच राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे पण म्हणून कोणि त्यांना मारहाण करायला जात नाही.
निषेध करण्याच्या अनेक पद्धती आणि सर्वमान्य मार्ग आहेतच की.
नंतर तुम्ही या घटनेचा आता कितीही वेळा निषेध केलात तरी तुमच्या मनात काय आहे ते कळलेच.
राळेगणसिद्धीतल्या दारूडयाला खांबाला बांधून मारणे वेगळे आहे आणि खरेतर चूकही आहे.
आणि अण्णा जनतेने तुंम्हाला मोठेपणा दिला याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रत्येक विषयात आपण बोलायलाच पाहीजे

मी कायम  महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा आहे असे तुंम्ही म्हणता मग हे काय बोलताय?

तुमच्या प्रतीक्रियेवर शरद पवारसाहेब बरोबर म्हणाले की " गांधीवादाची नवी व्याख्या आम्हाल कळली"

अण्णा हल्ली प्रत्येक घटनेबद्दल तुम्हाला पत्रकार आणि सामान्य लोक तुमचे मत काय असे विचारतात ,तुमचे नाव भारत भरच काय कदाहित जगभरही झाले असेल ,अण्णा तुमच्यामुळे लोकपाल येईल, तुमच्यामुळे माहीतीचा कायदा आला ,तुमच्यामुळे ग्रामविकास झाला हे अगदी बरोब्बर. 
पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मतप्रदर्शन करायला हवेच का?   

4 comments:

  1. anna is not national solution for all problems .his limitations are upto anti-corruption movements.pratyek thikani nak khupasu naye ek tar nak sujel nahi tar nak tari kaple jaiel. sadya comments pahata annanchi vatchal tikadech challali ahe.

    ReplyDelete
  2. अण्णा हजारे हे त्यांची विधाने करण्यात व नंतर घुमजाव करण्यार प्रसिध्द आहेत.त्यांच्या विधानाविषयी आपण काय बोलाव.
    परंतु अशी मारहाणीची घटना घडली हे खुपच चुक आहे. राजकारणत अनेकांशी जमत नाही मतभेद असतात परंतु याप्रकारे वक्तव्य करणे व नंतर सारवासारव करणे ह्याची सवय लागली आहे ती लवकर सुटणे कठीण आहे.

    ReplyDelete
  3. अहो अण्णा बोलले नाहीत खरेतर ते बरळले.
    भ्रष्टाचार नसावा असे बहुसंख्य जनतेला वाटते म्हणून त्यांनी अन्नाच्या आंदोलनाला पाठींबा दिला. पण याचा अर्थ या देशातील जनतेचा उद्धार केवळ तेच करणार अशी टीम अण्णांना वाटू लागले आहे. देशातील जनतेचे सर्व निर्णय फक्त तेच घेवू शकतात किंवा केवळ त्यांनीच केले पाहिजेत असा अट्टाहास दिसतो. पण त्यांनी लक्षात ठेवावे कि लोकांनी दिलेला पाठींबा हा विषयाला असतो त्यांना नसतो. पण समोर श्रोते असले व हातात माईक आला कि बरळायाचेच असते असा बहुदा नियम असतो.
    खरेतर मागच्या आठवड्यात आपल्या खूप मित्रांना अण्णांनी दुखावले काय तर म्हणे दारू पिली तर खांबाला बांधून मारा. कितीतरी मित्रांना दुख अनावर झाल्यामुळे जास्त प्यावी लागली. बर ते पिले पण बरळले अण्णा.
    प्रांजळपणे सांगायचे तर मलातरी हे बरळणारे मित्र फार प्रिय आहेत. आपल्या कित्येक स्मरणातील आठवणी या बरळनाऱ्या मित्रांमुळेच आहेत. जर त्यातही एखादा लिमिट बाहेर गेला तर मग काय बहारच असते. सध्या टीव्ही वरील वाद अथवा विचारमंथन हे सर्व दोन-चार लावून चालले आहेत असे समजून बघा, केवळ निखळ आनंदच मिळेल.
    त्यामुळे मी तरी चाललेले सर्व काही मनसोक्त एन्जोय करीत आहे.

    ता.क. ब्लॉग साठी संजय जोशींचे विशेष आभार नाहीतर आम्हीतरी कुठे जाऊन बरळणार!

    ReplyDelete
  4. i would also agree that anna hazare shouldnt have passed such a comment.the respect and support he receives from the people should not be put at stake.sometimes silence is better than words!a good blog!all the best!

    ReplyDelete