Monday, July 30, 2012

क्रोशे-- छंद आणि कला

क्रोशेचा छंद


लहानपणासून जोपासलेला छंदातून माणसाला काय सुचेल हे सांगता येत नाही
एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करणा‍र्‍या  सौ स्वाती पटवर्धन यांना क्रोशेच्या सूया घेऊन नवनवीन पॅटर्न/डिझाईन  करत बसण्याची आवड आहे. ही आवड कशी निर्माण झाली हे त्यांनाही आठवत नाही
पण त्याची सुरुवात खूप लहानपणि झाली हे मात्र नक्की. सुरुवातीला  पुस्तकात बघून ,चुकत चुकत क्रोषे विणणे चालूच होते. कधी Table Cloth कधी घराच्या दारावर लावण्याच्या माळा ..जमेल ते सर्व काही करणे चालूच होते




आधी पुस्तकातील पॅटर्न करून बघताना नंतर त्यातच जरासा बदल करणे ,वेगवेगळे रंग वापरणे यातून त्यांची कला फुलतच गेली.शाळेतून  कॉलेजमधे गेल्यावनंतर देखीलदेखील हा छंद कायम होता.
शिक्षण संपल्यावर नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर लग्न झाल्यावरसुद्धा त्यांचे क्रोशे चे प्रयोग चालूच होते पण नंतर नोकरीतील ,संसारातील जबाबदार्‍या आणि मुले लहान असताना त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही.
पण गेल्या १० वर्षात पुन्हा त्यांना सुया खुणावू  लागल्या आणि मग  कामाच्या रोजच्या धकाधकीतून मनाला उभारी  देणार्‍या या छंदाकडे त्या पुन्हा एकदा वळल्या .
त्यांनी एक दिवस असेच काही टॉप्स मुलीसाठी केले आणि काही तिच्या मैत्रीणिंना सुद्धा दिले ,बघता बघता  तिच्या वर्गातील इतर मुलीसुद्धा मागणी करू लागल्या ..जमेल तसे त्यांची मागणी पूर्ण करीत होत्या.

कॉलेजमधे शिकणार्‍या त्यांच्या मुलीला ,पूर्तीला, एव्हाना आपल्या आईच्या कलेने भुरळ घातली होती .तिच्या कानातील टॉप्सची डिमांड्पण वाढली होती . लहानपणापसून आई काय करतेय हे बघणारी पूर्ती शिकू लागली आणि आता पूर्ती स्वतः की चेन्स , टॉप्स,नेकलेस अशा वस्तू करते आणि त्याना उत्तम मागणी आहे.





गेल्याच आठवड्यात Pune Mirror ने Crochet वर एक feature केले होते त्यात  पूर्तीच्या  कलेसंबंधी लिहीले आहे आणि काही फोटो पण छापले .त्याची ही लिंक...
http://www.punemirror.in/article/31/2012072520120725085022546af4c329/Knots-and-crosses.html

फ़ेसबुकवरील तिच्या Yellow Hook पेजवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल .
जरूर भेट द्या.
https://www.facebook.com/pages/The-Yellow-Hook/282242225133643

8 comments:

  1. Very Interesting Article (Dilip Patwardhan)

    ReplyDelete
  2. Very interesting & informative article about innovative usage of Croshet.
    More important is the fluency & style of writing, Sirji, please keep posting, we really like & appreciate it.

    ReplyDelete
  3. तुमच्या ब्लॉगवर क्रोशेबद्दलच्या पोस्टचं शिर्षक वाचून आधी चकीत झाले. स्वातीताईंप्रमाणेच मलादेखील हा छंद अतिशय प्रिय आहे. पुणे मिररमधला लेख आत्ताच वाचला. तुमच्यामुळे आणखी एका चांगल्या कलाकाराची ओळख झाली. मन:पूर्वक आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. कांचंन तुमचा ब्लॉग बघितला फारच उत्तम आहे.
      तुम्ही अनेक कलात निपुण उत्तम कलाकार आणि त्याहून उत्तम शिक्षक आहात. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा!!

      Delete
  4. Thanx a lot for blogging about us! It gives us a boost!
    Thank you everyone for the appreciation! :)

    very well and aptly written!

    -Swati and Poorti

    ReplyDelete
  5. @kanchan karai ... Nice work! just saw all your crochet stuff... Its good to connect with people of similar interests! :) TY UNCLE SAM!

    ReplyDelete