Sunday, August 29, 2010

याला उत्तर काय ?

याला उत्तर काय ?
सहजच चाललेल्या गप्पांच्या ओघात एका मित्राने दोन घटना सांगीतल्या 
 प्रायमरी तल्या एका शिक्षिकेने  मुलांना निबंध लिहायला सांगीतला .
विषय होता मला काय /कोण व्हावयाचे आहे आणि देवाकडे तुम्ही काय मागाल.
सायंकाळी घरी गेल्यावर त्या एकेक नि्बंध तपासत होत्या ्तपासून झाल्यावर त्यांनी बाजूला ठेवलेला एक निबंध पुन्हा वाचायला घेतला ,त्याचे पती जेंव्हा घरी आले आणि त्यांनी बायकोला विचारले अग का रडते आहेस ? न बोलता बायकोने ती वही नवर्‍याच्या हातात ठेवली म्हणाल्या हे  वाचा जरा माझ्या एका विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध आहे
" देवा मला टिव्ही कर मला टिव्हीची जागा घ्यायची आहे त्याच्यासारखे व्हायचे आहे  म्हणजे माझी मला एक जागा मिळेल घरातले सगळे माझ्या अवती भवती असतील, मी काय सागतोय त्याकडे कान देउन ऐकतील मी बोलत असताना मला कोणीही थांबवणार नाही टिव्हीकडे जसे सगळे कायम लक्ष ठेउन असतात तस्च माझ्याकडे पण लक्ष देतील बाबा अगदी खूप दमून आले तरी पण माझ्यासमोर बसतील अगदी न कुरकुरता अणि माझी आई काही कारणाने त्रासली असेल ,कंटाळली असेल तरीपण माझ्याजवळ असेल आणि माझे भाउ बहीण माझ्याजळ बसण्यासाठी भांडतील आणि घरातले सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेउन माझ्यासाठी वेळ देतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी माझ्यामुळे घरातले सगळे आनंदी होतील.
देवा मला अजून काही नको मला टिव्ही कर मला सगळे मिळेल
हे वाचून नवरा म्हणाला " बिच्चारा ! कसे आईवडील असतात एकेक! बापरे"
बाई नवर्‍याकडे बघून म्हणतात "आपल्याच मुलाने लिहीलाय हा निबंध"

दुसरी घटना सुद्धा एका शाळेतीलच आहे
मुलांना शिक्षक विचारतात .................
तुम्हाला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे 
कोणाला पायलट व्हायचे असते कोणाला इंजीनीअर, कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, तर कोणाला कारखाना काढायचा असतो ..प्रत्येकाला काहीतरी  व्हायचे असते एक मुलगा मात्र जे सांगतो ते ऐकून शिक्षक थक्क होतात.
तो मुलगा म्हणतो "मला व्हिलन व्हायचे आहे"
शिक्षक भांबावतात पण विचारतात "काय रे बाबा काय डोकं ठिकाणावर आहे ना?
मुलगा " सर ,कोणत्याही सिनेमात अख्खा पिक्च्रर संपेस्तोवर 
व्हिलन मज्जा करत असतो आणि हिरोची मात्र धुलाई होत असते. एव्हढेच कशाला रामायणात सुद्धा रामाला कायम त्रास आहे आणि रावण तर काय मजाच करत असतो .सीतेला पळवून नेतो तिला त्रास देतो. एव्हढा दुष्ट असून सुद्धा मेल्यावर स्वर्गात जातो कारण त्याला रामाने म्हणजे देवाने मारलेले असते"
 समाजाची चूक का आईवडीलांची चूक ?
बरोबर काय आणि चूक काय कोणी आणि कसे ठरवायचे ?

Tuesday, August 10, 2010

बेवारस नाते -डॉ. सुवर्णा नेने

ही कविता पुण्यातील सुप्रसिद्ध Implantologist  डॉ. सुवर्णा नेने यांनी केलेली आहे.
त्यांच्या दंतवैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानाचाआणि त्यांच्या कौशल्याचा लाभ त्यांच्या हजारो पेशंटना मिळतच असतो, पण त्या उत्तम कविताही करतात हे मला माहीत नव्हते.
त्याची ही कविता "बेवारस नाते" माझ्या ब्लॉगवर टाकण्यास  परवानगी दिल्याबद्दल मी  त्यांचा अत्यंत आभारी आहे ही कविता त्यांच्या Clinic मधे त्यांनी लावली होती  त्यांचे लेखन कौशल्य यानिमीत्ताने सर्वांनाच दिसेल
"बेवारस नाते"
रस्त्यावरच्या त्या बेवारस कुत्र्याला,
कळणारच नाही कधि आत्ता..............
की त्याने हक्क वगैरे मागायचे नसतात !
ना कधि झोकून देउन प्रेम करायचे असते !
केंव्हातरी शिळा भाकरतुकडा फेकणार्‍या,
Socalled मालकाला विचारायचे तर नसतेच,
आज तुकडा का नाहे म्हणून?

त्याने स्विकारायचे असते फक्त सत्त्य !
Convienience चे उष्टे वाळके तुकडे !
Inconvienence मुळे पेकाटात बसलेल्या !
सणसणीत लाथेसारखेच निर्लज्जपणे !
उगीच भाकरी टाकणार्‍याला,
मालक वगैरे........... मानायचे नसते !
’ना त्याच्या भरधाव  गाडीमागे,
छाती फुटेपर्यंत पळायचे असते !

पण कळलेच नाही त्या वेड्याला!
जगात दिसते तसे काहीच नसते!
भरधाव गाडीने उडवुन रस्त्यावर !
गतप्राण झाल्यावरही,
त्याला कढिच उमगणार नसते
सामाजीक बांधीलकीत जखडलेल्या
त्या Socalled पांढरपेशा मालकाला,
उगीच हळहळून त्या बेवारश्याशी
असलेले नाते
आता जगजाहीर करणे
Convienient नसते !

डॉ. सुवर्णा नेने

Wednesday, June 09, 2010

बेवड्याची प्रतीज्ञा

बारच
माझा देश आहे
...
सारे
बेवडे माझे बांधव आहेत.
माझ्या
ब्रॅंडवर माझे प्रेम आहे.

बारमधिल
सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मी मान ठेविन.

माझ्या
बारमध्ये आनंदाने आणी विविधतेने झुलणारया बेवड्यांचा
मला अभिमान आहे.

माझा
बार आणी माझी दारू यातच माझी सौख्य सामावलेले आहे.

जय
दारू

चला पटकन एक पेग मारू

Monday, May 17, 2010

मोनालिसा --म्युझियम बंद झाल्यावर मोनालिसा


altम्युझियम बंद झाल्यावर मोनालिसा काय काय करतेय ते बघाच
 
हे कोणी जमवलय ते मला माहीत नाही

Tuesday, September 22, 2009

मराठी माणूस आणि व्यवसाय

मराठी माणूस आणि व्यवसाय
खरे खोटे मला माहिती नाही पण पुढे सांगीतलेल्या कथेतील घटना अगदिच अशक्य आहे असे मात्र नाही.

एका सरकारी खात्याचे एक टेंडर निघालेले असते , नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्याचे बजेट ठरवलेले असते, की या प्रोजेक्ट्चा खर्च रू.१५ लाख येइल .
अनेक जणांच्या कोटेशन मधून तीन जणांना साहेब चर्चेला बोलावतात .
पहीला येतो आमचा मराठी माणूस...............
साहेब-

आता बघा आमचा अंदाज होता १५ लाखाचा पण तुमचे कोटेशन आहे २० लाखाचे ,सांगा कसे काय करायचे?
सांगा किती कमी करताय?
मराठी माणूस—

हे बघा साहेब जे काय कोटेशन भरले आहे ते अगदी बरोबर आहे यात काही कमी होणार नाही ,आ्म्ही क्वालीटीत काहीही तड्जोड करत नाही, सर्व पार्ट अस्सल वापरतो आमच्याकडे डुप्लिकेट माल वापरत नाही, अहो आमचा ख्रर्चच मुळी १८ च्या घरात जातोय ,त्यामुळे यामधे काहीही कमी होणार नाही.

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक सरदारजी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय २५ लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

२५ लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

सरदार-

क्या साहबजी समझ लो महंगाइ कितना बढ गया है ,हर चीज का दाम बढ गया है, हमे पता है आपको टाँप क्वालिटी चाहिये ,तो हम भी टाँप क्वालिटी का माल देंगे,और आप्को भी मालूम है आपके ऑफ़ीस मे भी हर जगह देना पडता है

साहेब-

फिर भी हे जरा जास्तच होतात

सरदार-

क्या साहबजी समझ लो आपको भी इसमे दो रखा है

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक मारवाडी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय ३० लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

३० लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

मारवाडी-

सायेब ते सर्व जरा बाजूला ठेवा आणि आमचे ऐका कोणि काय कोटेशन भरलय आम्हाला सगळं म्हायतीय

आपण असे करा तुम्ही ऑर्डर आमच्या नावाने काढा आम्ही त्या मराठी माणसाकडून काम करून घेतो त्याचे त्याला पैसे देवून टाकतो ,तुम्ही पेमेंट्चे काम त्यवढे लवकर करा ,त्या मराठी माणसाकडून आम्ही १५ लाख देवून काम करून घेतो वरच्या १५ तले निम्मे तुमचे निम्मे आमचे.

पुढे काय झाले ते सांगायला नकोच नाही कां???


Sunday, August 30, 2009

माहुली येथील देउळे








साताऱ्या जवळ माहुली नावाचे एक गाव आहे ,तिथे जुन्या काळातील देउळे आहेत ,त्यांचे काही फोटो....




सर्व देवळे अतिशय सुंदर आहेत ,पण दुरावस्थेत आहेत.

या ठिकाणी तर काही लोक पत्त्याचा जुगार खेळत होते,
















किती सुंदर घाट आहे बघा आणि त्याची काय अवस्था
झाली आहे ते नंतरच्या फोटोत पहा.











आजुबाजुला राहणाऱ्यांनी धोबीघाट्च बनविला आहे










आणि हे तर देवळातच कपडे वाळत घालायला निघालेले दिसत आहेत

















अशा कोरीव मुर्ती इथे अनेक बघायला मिळतील.











आणि इथे असे कोरीव खांबही अगणित आहेत.

















पहारा द्यायला हा अतिशय सुंदर नंदि आहे .












आणि दृष्ट लागू नये म्हणून हयांची नेमणूक.

हे सर्व फोटो श्री . महेन्द्र मोरे यांनी काढलेले आहेत.

Wednesday, August 26, 2009

डिजीटल कँमेरा आणि मेगा पिक्सेल...............


डिजीटल कँमेरा आणि मेगा पिक्सेल...............

मला नविन डिजीटल कँमेरा घ्यायचा आहे तर किती मेगा पिक्सेलचा घ्यावा आणि आणि डिजीटल कँमेरा घेताना नक्की काय पहावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो …....म्हणजे मला तरी पडला होता .

म्हणून मग इंटर्नेट्वर बरयापैकी सर्च करून आणि काही एक्सपर्ट फोटोग्राफर मित्रांकडून माहीती मी मिळवली.



मेगा पिक्सेल म्हणजे नक्की काय?

पिक्सेल म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसणारे बारिक ठिपके .जे पेटले (म्हणजे चार्ज झाले ) की एक चित्र स्क्रीनवर दिसते.

मेगा पिक्सेल म्हणजे एक मिलीयन पिक्सेल (दहा लाख पिक्सेल). अजून दोन बाबीं खूप महत्वाच्या आहेत.

एक आहे छपाईचा कागदाचा आकार आणि दुसरी तुमचा प्रिंटर किती DPI --Dots per Inch छापू शकतो त्यावर.

साधारणपणे 6”x 4 “ standard फोटो पेपर साइझ आणि 8” x 11” हा standard A4 साइझ समजला जातो

फिल्म क्वालीटी प्रिंट साठी कमीत कमी 300 DPI ची गरज असते आणि 600DPI च्या हून जास्त काहीही असले तरी तो फरक लक्षात येण्याएवढा नसतो.

पुढील गणित या बाबी स्पष्ट करेल.

6”x 4 “ @ 300 DPI म्हणजेच (6x300) x (4x300) = 2,160,000 म्हणजेच 2.16 मेगा पिक्सेल

त्यामुळेच डिजीटल कँमेरे जेंव्हा नुकतेच बाजारात आले होते तेंव्हा त्यावर 2.1MP असे छापलेले असायचे.

अशाचप्रकारे

6x4 @ 600 DPI म्हणजेच (6x600) x (4x600) = 8,64,0000 म्हणजेच 8.6 मेगा पिक्सेल

म्हणूनच सध्या 8 मेगा पिक्सेल कँमेरे जास्त प्रचलीत आहेत.

पण म्हणून जेव्हढे जास्त मेगा पिक्सेल तेव्हढा कँमेरा चांगला असेच नसते.

जर तुम्हाला फोटो प्रिंट्स काढायचे असतील तरच नाहीतर त्याची गरज नाही.

डिजीटल कँमेरे लवकर पॉप्युलर होण्यास हीच गोष्ट महत्वत्वाची ठरली

खरेतर बहूतेक हौशी फोटोग्राफेर फोटो प्रिंट्स नको म्हणून तर डिजीटल कँमेरा घेतात. त्यांना त्यांनी काढलेले फोटो काँप्युटरच्या माँनिटरवर बघण्यात इंटरेस्ट असतो.त्यामुळे खरेतर सर्वसाधारण हौशी फोटोग्राफर साठी 3MP कँमेरा अगदीच चालू शकतो

कारण3MP किंवा अगदी 6MP कँमेरयाने काढलेल्या फोटोची अगदी12” x 18" जरी प्रिंट काढली तरी फारसा फरक दिसत नाही

पण मग कँमेरा घेतना नक्की काय बघायचे ? कोणत्या आकड्याला महत्व द्यायचे? असा प्रश्न येतो.

गंमतीची गोष्ट हीच आहे की सर्वात महत्वाच्या एका गोष्टीचा उल्लेख कँमेरा बनवणारे सुद्धा कमीच करतात. आणि तो आहे सेन्सर साइझ. खरेतर तुमच्या कँमेरयातून निघणारा फोटो कसा येइल ,त्यात रंग कसे दिसतील ,फोटो छान वाटेल का नाही हे सेन्सर साइझ वर ठरते. थोडक्यात सांगायचे तर ज्या कँमेरयातील सेन्सर मोठा असेल त्यातून फोटो चांगला निघतो. म्हणूनच जरी अगदी 2.1 MP चा डिजीटलSLR कँमेरयातून काढलेले फोटो अतिशय उत्तम असतात.परंतू तोच फोटो काँम्पँक्ट डिजीटल कँमेरयाने काढला तर दोघातला फरक चांगलच कळून येतो.कारण प्रोफेशनलSLR कँमेरयातील इमेज सेन्सरचा एरीया 370 ते 550 sq.mm.असतो आणि आपल्याकडील काँम्पँक्ट डिजीटल कँमेरयाचा असतो 25 ते 50 sq mm


म्हणूनच छोट्याश्या मोबाइल फोन मधे 5 मेगा पिक्सेल कँमेरा असतो आणि काही मोठ्ठ्या D-SLR कमी मेगा पिक्सेल चे असतात,पण मिनिएचरायझेशन मुळे कँमेरा फोन मधे 5 sq mm इतका छोटा सेन्सर असतो आणि तयामुळे पिक्सेल साइझ कमी करावा लागतो आणि त्यामुळे टेक्निकल भाषेत noise to signal ratio म्हणतात तो वाढतो. खरेतर या कमी जागेत जास्त मेगापिक्सेलमुळे पिक्च्रर क्वालिटी वर परिणाम होतो

पण सध्याच्या या कट थ्रोट कॉम्पिटिशन्च्या युगा अशा गिमीक्सच मोठ्ठ्या प्रमाणावर केल्या जातात,हा अर्थातच पूर्णपणे वेगळाच विषय आहे