Sunday, December 25, 2022
Thursday, August 05, 2021
आमचीही वारी
वारी म्हटले की विठ्ठलाचं नामस्मरण, पायी चालणें ,टाळ असेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं
.पण मी वारीकडे वेगळ्याच नजरेने पाहते ..दर
वर्षी ताई व ताईंच्या मैत्रिणी ,म्हणजे माझ्यापण तायाचं म्हणाना पुण्याला आमच्या घरी येऊन वारीसाठी
पायी जायच्या . सहज एकदा ताई म्हणाल्या "तू पण चल ना आमच्याबरोबर "पण मी
आढेवेढे घेत "नको हो ताई मला नाही जमणार " असं म्हटलं ..पण तक्षणी ताईने
मला प्रोत्साहन देत "चल ग तेव्हढीच मजा " म्हटल्यावर आमची स्वारी नकार
बाजूला सारत,मनाचा
हिय्या करुन वारीसाठी तय्यार झाली . मग माझ्याबरोबर माझ्या काही मैत्रिणी पण वारीत
सामील झाल्या .
खरं सांगायच
तर मी कधी वारीला जाईन असं
स्वप्नातहि वाटलं नव्हतं .आमच्या ताईंची कृपाचं म्हणांना .दादा आणि अनिलकाका
वारीचं इतके सुंदर नियोजन करायचे सगळ्यांची
जातीने काळजी घ्यायचे . त्यांचा दोघांचा केवढा तो उत्साह असायचा
दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडंच .
आमचं वारीला जाणं म्हणजे एक मस्त ट्रिपचं व्हायची सगळेच देहभान
विसरून समरसून जायचो , गप्पागोष्टी
,गमती जमाती
खाण्यापिण्याची रेलचेल यामध्ये कितीही चालणें झाले तारि दमलोय असं वाटत नव्हतं
.दरवर्षी वारीला जाताना आमच्या उत्साहाला उधाण यायचं ..या वारीच्या निमित्ताने
आम्ही सगळे इतके जवळ आलो की आमचं एक कुटुंबच तयार झाले.
आता बघूया देवाच्या मनात काय आहे ते?
सौ विणा जोशी
Saturday, July 31, 2021
बदक
बदक
माझा मित्र, देवेन भावे, याने त्याच्या शाळेतल्या शिक्षकांवर केलेली उपहासात्मक कविता
ती भावशून्य बुब्बुळे.....
तो पिंपळखोडासम बांधात
ते मुखवैभव बावळे...........
ती बदकसदृश पाउलें
डोक्यावर बाभळ बहरे......
ती भुईकोटासम कंबर
बलरहित बाहू फुरफुरे.......
हे रुप तुझे साजिरे
पुरुषी परि लाजरे...............
विद्वत्तेला तुझिया
उपमाच न दिलेली बरे..........
Wednesday, October 16, 2019
Sunday, September 15, 2019
अंधश्रद्धा
का ?
तर म्हणे तो काळ वाईट असतो ,
कारण या काळत तुमची पितरे जेवायला येतात .
आता मला सांगा पितरे म्हणजे तुमचे पूर्वज येणार असतील, तर त्यात वाईट काय आहे ?
बर आदल्या दिवसापर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरातच असतो
त्या सुखकर्त्याने तुम्हाला भरपूर आशिर्वाद दिलेला असतो.
तरीपण हा काळ वाईट का ?
माझ्या मते हि फ़क्त अंधश्रद्धा आहे , बाकि काही नाही
Friday, March 03, 2017
बॅंकेतून पैसे काढण्यावरील बंधने
Thursday, November 17, 2016
१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न
१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न
१.राजकारणि आणि सरकारी अधिकारी वर्ग लाच मागणे बंद करतील का?
२.राजकिय पक्ष निवडणुकित नोटांच्या ऐवजी धनादेश वापरतील का?
३.उद्योगपती आणि राजकारणि सर्व प्रकारचे कर इमानदारीने भरतील का?
४.कोणत्याही कामासाठी नोकरशहा पैसे खातात हे बंद होइल का ?
५.बांधकाम क्षेत्रात बदल होउन बिल्डर लोक नोटा देउन बांधकाम नियमावलिला बगल देणे बंद करतील का ?
६. सिग्नलला लपून सामान्य नागरिकांना दंडाचा धाक दाखवून पैसे उकळणारे पोलिस चौकात उभे राहुन वाहतुक नियंत्रण करतील का?
७.दंडाचा धाक दाखवून पैसे उकळण्य़ाऐवजी पोलिस पावती फ़ाडतील का ?
८. याचबरोबर सतत वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक शिस्तीत वाहने चालवतील का? सतत पोलिसांना नावे ठेवण्यात अर्थ नाही आपणही नियम पाळलेच पाहिजेत
९. बहुतेक राजकारणि लक्षावधी रुपयांच्या गाडीतुन हिंडताना दिसतात ,मोठ्या बंगल्यात राहतात पण कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करतान दिसत नाहित हे थांबेल का ?
हे थांबले नाही तर कोणत्याही नोटा काळ्याच होणार
Thursday, August 18, 2016
ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत- साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधु # Rio Olympics #Sakshee Malik # PV Sindhu
ज्या देशात कुंभमेळ्यातील भुक्कड साधूंवर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त खर्च होतो , त्या देशाने खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा ठेवु नये.
खेळात भाग घेणे आणि प्रेक्षकांची मने जिंकणे हे पदकापेक्षा जास्त महत्वाचे आहे असे ज्या देशात सांगितले जाते त्या देशाला पदके कशी मिळणार ?
ज्या देशातील क्रिडा संघटनांचे प्रमुख कोणताही खेळ न खेळता केवळ त्यांच्या राजकिय संबंधांमुळे वर्षानुवर्षे या संघटनांवर राज्य करतात
आणि
जोपर्यंत या संघटनांवर मरायला टेकलेली म्हातारी गिधाडे बसलेली आहेत तोपर्यंत Olympic मधे आपली प्रगती होणे अवघड आहे.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी दोन मुलिंनी भारताची लाज राखली
सकाळी साक्षी मलिकने महिला कुस्तीतले पहिले ब्रॉंझ पदक मिळवले
आणि रात्री सिंधुने सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे.
यात दोघींच्या घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या गुरूंनी दिलेले प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे.
दोघींच्या जिद्दीला सलाम
Tuesday, January 26, 2016
Tuesday, November 10, 2015
Wednesday, February 25, 2015
माननिय छगन भुजबळसाहेब तुमचा सल्ला हवा आहे
भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?
आजच्या लोकसत्तेतील बातमी
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांपुढील अडचणी आता वाढतच असून तब्बल २६५३ कोटींची मालमत्ता असल्याच्या आरोपप्रकरणी खुली चौकशी करण्यास शासनाने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी दिली आहे.दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
नाशिक येथे चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, राम बंगला, गणेश बंगला, येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला, दिंडोरीत १०० वायनरीसाठी एकर भूखंड, वरळीत सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट, चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालये
माहिम येथे फ्लॅट, नवी मुंबईत दुकाने, १०० कोटींची चित्रे व इतर पुरातन वस्तू, जुहूतील वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट, इंडोनेशियात खाणी, नाशिक येथे वीज कंपनी, शिलापूर येथे १५ एकर भूखंड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा अडीचशे एकर भूखंड, साखर कारखाना
साडेचारशे एकरवर भुजबळ वाइन्स, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे खारघर येथे २५ एकर भूखंड, नीश इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचे दादर परिसरात व्यापारी इमारती, सांताक्रूझ येथे निवासी इमारत, लोणावळा येथे ६५ एकर भूखंड, येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे २६ व ६५ एकर भूखंड, उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.
भुजबळ्साहेब तुमच्या वेबसाईट्वर ( http://www.chhaganbhujbal.org/p2.html )
लिहील्याप्रमाणे "तुमचे बालपण अतिशय हलाखीत गेले घरची परिस्थीती अत्यंत गरिबीची होती आणि तुमच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे म्युनिसिपल मार्केट मधील भाजीचा एक गाळा होता."
नंतर आपण शिवसेनेत गेलात, मुंबईचे महापौर झालात, आमदार झालात.
महाराष्ट्राच्या राजकारणातही आपण खुप नाव कमावले आहे. आधी मंत्री नंतर उपमुख्यमंत्री झालात,
अत्यंत दैदिप्यमान कारकिर्द आहे तुमची.
दरम्यानच्या काळातील आपले समाजकार्यही सर्वश्रुतच आहे.शिक्षणक्षेत्रातही आपले नाव मोठे आहे.
मात्र आजच्या लोकसत्तेतील ही बातमी वाचुन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे,खरे म्हणायचे तर सल्ला विचारायचा आहे.
आपण जर हे वैभव कसे मिळवायचे ते सर्वसामांन्यांना सांगीतले तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची गरिबी दूर होईल, सर्वत्र आनंदी आनंद होइल .
देवांच्या फोटोबरोबर आपलाही फोटो घराघरात दिसेल .
Monday, August 11, 2014
पुणे विद्यापिठाचा नामविस्तार नामांतर
श्री शरद पवार साहेबांनी त्याच कार्यक्रमाचे वेळी सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात यावे अशी सूचना केली .
या बाबतीत माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार ??
पण काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ पुणे विद्यापिठाचा नामविस्तार आत्ताच्या आत्ता करा नाही तर मी मंत्रीं मंडळाच्या बैठकीस उपस्थीत राहणार नाही म्हणून रुसून बसल्याचे आपण सर्वांनीच टिव्हीवर पाहिले होते .
त्याना होणारे दुःख खरोखरच बघवत नव्हते .(राजीनामा नाही दिला)
खरेतर छगन भुजबळांकडे या दुःखातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग होता. नाशिक मधे असलेल्या त्यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याना सहज देता आले असते.
पण साहेबांनी ही संधी दवडली .
पण काही हरकत नाही अजुनही ते त्याच्या संस्थेला कोणाचे तरी नाव देउ शकतात .
खरेतर महारष्ट्रातील अनेक खाजगी विद्यापिठे नामविस्तारासाठी अजुनही उपलब्ध आहेत
आणि आपल्या देशात राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रासाठी आपले बलिदान देणार्या महिलांचा सन्मान होईल .
१.भुजबळ नॉलेज सिटी
२.भारती विद्यापिठ
३. डि. वाय. पाटील विद्यापिठ
४ दता मेघे मेडिकल कॉलेज विद्यापिठ
५. एम जी एम इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
६. विद्या प्रतिष्ठान बारामती
७. प्रवरा इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
आणि इतर अनेक...............................................
आता तरी मला इतकीच आठवली
नेते हो बघा विचार करा .
निवडणुकीपुर्वी हि संधी तुम्हा्ला उपलब्ध आहे
त्वरा करा
आचार संहिता कधिही लागू होईल
Friday, November 01, 2013
Monday, November 12, 2012
Sunday, October 21, 2012
Monday, August 06, 2012
बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)
Monday, July 30, 2012
क्रोशे-- छंद आणि कला
लहानपणासून जोपासलेला छंदातून माणसाला काय सुचेल हे सांगता येत नाही
पण त्याची सुरुवात खूप लहानपणि झाली हे मात्र नक्की. सुरुवातीला पुस्तकात बघून ,चुकत चुकत क्रोषे विणणे चालूच होते. कधी Table Cloth कधी घराच्या दारावर लावण्याच्या माळा ..जमेल ते सर्व काही करणे चालूच होते
आधी पुस्तकातील पॅटर्न करून बघताना नंतर त्यातच जरासा बदल करणे ,वेगवेगळे रंग वापरणे यातून त्यांची कला फुलतच गेली.शाळेतून कॉलेजमधे गेल्यावनंतर देखीलदेखील हा छंद कायम होता.
शिक्षण संपल्यावर नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतर लग्न झाल्यावरसुद्धा त्यांचे क्रोशे चे प्रयोग चालूच होते पण नंतर नोकरीतील ,संसारातील जबाबदार्या आणि मुले लहान असताना त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही.
फ़ेसबुकवरील तिच्या Yellow Hook पेजवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल .
जरूर भेट द्या.
https://www.facebook.com/pages/The-Yellow-Hook/282242225133643
Thursday, November 24, 2011
Wednesday, November 09, 2011
एका मंगल कार्यालयाच्या पायर्या चढत असताना "आले आले" असा गलका ऐकू आला आणि मागाहून होणारी गडबड बघून जरा बाजूला झालो.
नवरदेवांचे आगमन झाले होते आणि वधूकडील नातेवाईक मंडळींची धावपळ सुरू झाली होती.
दारात येउन वधूच्या आईने वराला औक्षण केले त्याचे आणि वरमाईचे पाय दूधाने धुतले आणि पायघड्या घालत त्यांना आत नेले.
नंतर दिवसभर अशाच पद्धतीने मुलाकडच्यांपुढे हांजी हांजी करणे चालूच होते.
फोटो काढायचेत आधी मुलाकडच्यांचे काढणार.....
पंगत बसलीय आधी मुलाकडच्यांचे जेवायला बसणार....
असे अनेक प्रसंग दिवसभर घडत होते आणि मुलीचे नातेवाईक तत्परतेने आणि बर्याच वेळा नाइलाजास्तव करत होते.
बर्याच वेळा लग्नांमधे वादाचे प्रसंग येतात आणि त्याला अश्या जुनाट प्रथाच कारणीभूत असतात. आपल्याकडील बहुतेक लग्ने अशीच होतात मी हे जे काही पाहीले अनुभवले ते काही विशेष होते असे नाही, पण हे असे का आणि कशासाठी असा प्रश्न मला कायम पडतो.
नवरामुलगा आणि त्याचे नातेवाईक यांना खास वागणूक देण्याची ही पद्धत स्त्रीयांना ५०% आरक्षण देण्यार्या या एकविसाव्या शतकात अजुनही सुरूच आहे याचे मलातरी नेहेमीच आश्चर्य वाटते.
मला असे नाही म्हणायचे की मु्लाकडच्यांना मान अजीबात देउ नये,.... जरूर द्यावा... पण तितकाच मान मुलीकडच्यांना पण द्यायला नको का?
मुलीकडची बाजू म्हणजे पडती बाजू असे का असते?
लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराण्यांना एकत्र आणणारी गोष्ट असेल तर एकमेकांना योग्य तो मानसन्मान देउन करायला काय हरकत आहे!!!
हे सर्व लिहीण्याचे कारण की काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाउन आलो तेथील हा अत्यंत आनंददायी वेगळा अनुभव..............
हा लग्नसमारंभ म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींचे get together होते.
एकही दुर्मुखलेला चेहरा दिसला नाही.
लग्न नोंदणी पद्धतीने झाले आणि नंतर स्वागत समारंभ होता. पण आपण नेहेमी बघतो तसा मात्र नाही.
नेहमीच्या स्वागत समारंभाला फाटा देऊन एक उत्तम पार्टी झाली.
प्रवेशद्वारात मुलामुलीचे आई वडील हसतमुखाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहीले होते अणि जिव्हाळ्याने प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे स्वागत करत होते.
बर्यार्पैकी मंडळी जमल्यावर नवरा नवरीने प्रवेश केला आणि जमलेल्या सर्वांनी त्यांचे उभे राहून
टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले .
पार्टी सुरू करण्यापूर्वी नवरा नवरी मध्यभागी उभे राहीले आणि त्यांच्या एका मित्राने त्यांचे लग्न कसे ठरले त्याची स्टोरी खुसखुशीतपणे सांगीतली आणि नंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख सगळ्यांना करून दिल्यानंतर एका भन्नाट आणि धमाल पार्टीला सुरुवात झाली.
पार्टीत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती, Orchestra होता, उत्तम संगीत होते, डान्सफ़्लोअर होता
मुख्य म्हणजे मुलगा मुलगी स्टेजवर खोटं खॊटं हसत पाहुण्यांना भेटण्याऐवजी पाहुण्यांमधे हिंडत फिरत त्यांना भेटत होते आणि दोघेही उत्तम डान्सर असल्यामुळे डान्सपण करत होते.
त्यांना एका उत्तम बॅंडची साथ होती.
दोघांनी आलेल्या प्रत्येकाला थोडा वेळ का होइना डान्स करायला लावलाच . पुढ्चे तीन तास कसे गेले हे कोणालाच कळ्ले नाही .
समारंभाची सांगता मुलीच्या मोठ्या भावाने स्वत: लिहीलेले आणि चाल दिलेल्या गाण्याने झाली .
काळानुरूप आपणही बदलायला काय हरकत आहे.
नवपरिणीत वधुवर आणि आलेल्या सर्वांनाच माझा सलाम.....................














