व्यसन मुक्त व्हा डोळसपणे
कोणत्याही गोष्टीचा नाद,कोणताही छंद अतिरेकी प्रमाणात व्हायला लागला की त्याचे व्यसन होते आणि हे नादाचे/छंदाचे व्यसनात होणारे परिवर्तन हे अगदी नकळत होते; यांत्रिकपणे होते.
व्यसन म्हणजे फ़क्त दारू,सिगारेट,तंबाखू किंवा अमली पदार्थांचेच नव्हे तर देवाधर्माचे,धार्मीक उपचारांचे सतत पूजापाठ करणे हे सुध्दा व्यसनच असते .कसे ते सांगतो बघा पटतय कां !
सवयीने धार्मीक कर्मकांड करणारा , पूजापाठ करणारा हा यांत्रीक पणे या गोष्टी करत असतो कारण या गोष्टींची त्याला सवय जडलेली असते जर काही कारणांमुळे यातील काही करायाचे राहून गेले तर तो अस्वस्थ होतो,त्याला बेचैनी येते आणि मग ते डोक्यातून ते जात नाही.
आता मद्यपानाच्या ,सिगारेट,तंबाखू किंवा अमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल आपण जरा खोलवर विचार करूया म्हणजे यातील विरोधाभास लक्शात येइल.
बघूया लोकं दारू का पितात !................ कारणे अनेक आहेत
दारू पीऊन मन हलके होते, मजा येते, इतरांबरोबर मिसळता येते, नवे मित्र मिळतात, दारूच्या नावाखाली मैत्री वाढते अशी अनेक कारणे देऊन आपण स्वतःला फसवत असतो कसे ते पहा
प्रत्यक्शात काय होते ! तेच मित्र(?) दारूड्या म्हणून हिणवायला लागतात अणि टाळायला सुद्धा लागतात.
आपण जरा वरच्या क्लासचे आहोत , Modern आहोत, sophisticated आहोत असे दाखवण्या्साठी लोक दारू पितात. या प्रत्यक्शात काय होते ! हया दारूड्याच्या निरर्थक बडबडीला लोक कंटाळतात आणि त्याला टाळू लागतात. इतरांबरोबर संबंध वाढावेत म्हणून माणूस दारू पितो .पण होतं काय ? संबंध वाढण्याऐवजी ते बिघडतात.
माणूस दारू पितो ते काळज्या विसरण्या्साठी! पण सकाळी जाग येते ती डोकं ठणकण्यामुळे. एक नविन काळजी जन्म घेते. आपले प्रश्न/समस्या दाचेरूत विरघळवण्या्साठी दारू पिणारयाच्या समस्या कमी न होता दुप्पट होतात.
पिणारयांना हे कळत नसते कां? चानगले कळत असते! पण तरीही ते पितच राहतात.आता विचार करा दरू पिण्याची ख्ररच गरज आहे का?नीट विचार केलात तर तुमच्या लक्शात येइल की अजिबात गरज नाही.
पण ती सोडायची कशी????????????????
दारू सोडायची अहे ना मग लक्शात ठेवा ......................
प्रत्येक वेळी पिताना आपण काय करतोय, किती पितोय याचे भान ठेवा
दारूच्या प्रत्येक थेंबाची चव घेत घेत प्या .हळू हळू प्या आणि त्या प्रत्येक ठेंबाचा तुमच्यावर काय परिणाम होतोय याकडे लक्श द्या. तुमच्या प्रत्येक क्रुतीवर दारूचा किती प्रभाव पडतोय याकडे नजर ठेवा.
तुम्हाला जेंव्हा जेंव्हा प्याविशी वाटेल तेंव्हा जाणिवपूर्वक प्या. तुमच्या लक्श्यात येइल की तुम्हाला दारू सोडायला लागणार नाही, कारण अशा रितीने प्यायल्यावर तुमचे पिणे आपोआपच बंद होइल,दरूच तुम्हाला सोडेल.
यचा अर्थ असा नव्हे की हवी तेंव्हा हवी तेवढी दारू प्या ! पण ज्या कोणाला दारू सोडण्याची इच्छा आहे त्याने पुढचा ग्लास भरताना जाणिवपूर्वक आणि भान ठेवून भरावा आणि पिताना प्रत्येक क्शणाला आपण काय करतोय याची जाणिव ठेवा . हे जो कोणि अंमलात आणेल त्याची दारू नक्की सुटेल.
यातील कळीचा मुद्दा आहे जाणिवपूर्वक एखादी गोष्ट करणे आणि यंत्रवत करण्यातील फरक जाणून घेण्याचा!
तुम्ही एखादी गोष्ट जेंव्हा जाणिवपूर्वक करता तेंव्हा,तुम्ही ती बंधनाशिवाय अणि मोकळेपणाने करत असता यंत्रवत काम करताना तुमच्यावर हे करायलाच पहीजे असा दबाव तुमच्या अंतंर्मनावर असतो आणि त्यामुले तुम्ही ते करत राहता अगदी तुमच्या मनाविरूद्ध .
तेंव्हा एखादे व्यसन किंवा सवय आपल्याला सोडायचे अहे असा विचार न करता,ते आपण का करतोय याचा जाणिवपूर्वक विचार करा आणि मगच क्रुती करा.