Thursday, August 05, 2021

 

आमचीही वारी 



वारी म्हटले की विठ्ठलाचं नामस्मरण, पायी चालणें ,टाळ असेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं .पण मी वारीकडे वेगळ्याच नजरेने पाहते ..दर  वर्षी ताई व ताईंच्या मैत्रिणी ,म्हणजे माझ्यापण तायाचं म्हणाना पुण्याला आमच्या घरी येऊन वारीसाठी पायी जायच्या . सहज एकदा ताई म्हणाल्या "तू पण चल ना आमच्याबरोबर "पण मी आढेवेढे घेत "नको हो ताई मला नाही जमणार " असं म्हटलं ..पण तक्षणी ताईने मला प्रोत्साहन देत "चल ग तेव्हढीच मजा " म्हटल्यावर आमची स्वारी नकार बाजूला सारत,मनाचा हिय्या करुन वारीसाठी तय्यार झाली . मग माझ्याबरोबर माझ्या काही मैत्रिणी पण वारीत सामील झाल्या .

 

खरं सांगायच  तर  मी कधी वारीला जाईन असं स्वप्नातहि वाटलं नव्हतं .आमच्या ताईंची कृपाचं म्हणांना .दादा आणि अनिलकाका वारीचं इतके सुंदर नियोजन करायचे सगळ्यांची  जातीने काळजी घ्यायचे . त्यांचा दोघांचा केवढा तो उत्साह असायचा दोघांचेही  कौतुक करावे तेवढे थोडंच .

आमचं वारीला जाणं  म्हणजे एक मस्त ट्रिपचं व्हायची सगळेच देहभान विसरून समरसून जायचो , गप्पागोष्टी ,गमती जमाती खाण्यापिण्याची रेलचेल यामध्ये कितीही चालणें झाले तारि दमलोय असं वाटत नव्हतं .दरवर्षी वारीला जाताना आमच्या उत्साहाला उधाण यायचं ..या वारीच्या निमित्ताने आम्ही सगळे इतके जवळ आलो की आमचं एक कुटुंबच तयार झाले.

 दरवर्षी जुलै महिना कधी येतोय आणि आमची वारीची तारीख कधी ठरतेय याकडे  आमचे डोळे लागून राहायचे .पण म्हणतात ना सरळसोट ,नित्यनेमाने कुठलीही गोष्ट झालेतर अजून काय पाहिजे ?

 एक वर्ष पाऊसपाणी नंतर कोरोनाचे सावट जणू आमच्या वारीला गालबोटच लागलं आणि वारी थांबली .

आता बघूया देवाच्या मनात काय आहे ते?

 परत सर्व काही सुरळीत होईल आणि आपण सर्वजण परत भेटू आणि वारीला नक्की जाऊ अशी  आशा करूयात . मी प्रत्येक वेळी खूपच enjoy केली वारी . आता माझे लांबलेले पुराण संपवते ,नाहीतर तुम्ही वाचून कंटाळून जाल . शेवटी एव्हढच म्हणेन ,देवाच्या मनात असेल तर आपली वारी पुन्हा सुरु होईल आणि आपण सगळे तेव्हढ्याच  उत्साहाने वारीत खारीचा वाटा घेऊन सहभागी होउ .जर आले देवाजीच्या  मनी.....................................

सौ विणा जोशी 

Saturday, July 31, 2021

बदक


 

बदक 

माझा मित्र, देवेन भावे, याने त्याच्या शाळेतल्या शिक्षकांवर  केलेली उपहासात्मक कविता 


ती केसाच्छादित काया

ती भावशून्य बुब्बुळे.....

तो पिंपळखोडासम बांधात   

ते मुखवैभव बावळे........... 


ती बदकसदृश  पाउलें 

डोक्यावर बाभळ बहरे......

ती भुईकोटासम कंबर 

बलरहित बाहू फुरफुरे.......


हे रुप तुझे साजिरे

पुरुषी परि लाजरे...............

विद्वत्तेला तुझिया

उपमाच न दिलेली बरे..........