Tuesday, December 28, 2010

दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे

दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे!!
दादोजींचा पुतळा हलवणे बरोबर आहे का चूक या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
कारण एक सामान्य माणूस म्हणून मला असे वाटते की प्रत्येक विषयात बोलायचा आपल्याला अधिकार नाही.
पण पुतळा हलविल्यानंतर काल आमच्या महानगरपालिकेत  माननियांनी जो राडा केला ते बघून ह्या असल्या लोकांना आपण निवडून दिलेय ह्याचे नक्कीच दुःख   होतेय.
मोड्तोड करून ह्यांना काय मिळाले हेच कळत नाहीये.
एकमेकांच्या ऑफीस ची मोड्तोड करून प्रश्न सुटेल असे ह्यांना वाटतेय का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जनतेची उस्फूर्त प्रतिक्रिया होती.
मग काय जनतेने ह्यांना महानगरपालिकेत राडा करायला, काचा फोडायला,महापौरांची खुर्ची लाथा मारून तोडायला सांगीतले होते?आणि कधी?

माननिय नगरसेवक असेही म्हणाले की भगतसिंहांनीच सांगीतले होते की सरकारला जनतेचा क्षोभ जर ऐकू येत नसेल तर सरकारच्या कानापाशी स्फोट करायला लागतो.
माझी माननियांना विनंती आहे की तुम्हाला काय हवे ते करा पण स्वतःची तुलना भगतसिंहांशी करू नका ते फारच म्हणजे फारच महान होते.
मला या सगळ्या घटनांमुळे काही प्रश्न पडले आहेत.
पुढील काही दिवस ह्या प्रश्नांचा भुंगा मला छळणार आहे असे दिसतेय

उस्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
भावना दुखावणे म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
गोंधळ माजवून आणि राडा करून आणि सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून कोणाचा फायदा होतो?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  पुढे काय होणार?

Saturday, December 18, 2010

नविन सायकल घेताय? मग हे जरूर वाचा........

नविन सायकल घेताय मग हे वाचा...
मी गेली तीन वर्षे नियमीत सायकल चालवत आहे आणि सध्या सायकलींना बरे दिवस आले आहेत असे वाटावे एव्ह्ढ्या सायकली पुण्याच्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत.त्यातसुद्धा साधारणपणे मध्यमवयीन स्त्री पुरुषांचे प्रमाण जास्त दिसते.पूर्वी सायकल ही घरात वर्षानुवर्षे वापरली जाणारी गोष्ट होती आणि स्वयंचलीत वाहने कमी असल्यामुळे सायकल हेच कामावर जाणे ,कॉलेजमधे जाणे यांसाठी मुख्य साधन होते.मी कॉलेजमध्ये असताना रॅलेची साधी सायकल मला वडिलांनी दिली होती आणि मला तिने बरीच वर्षे साथ दिली, आणि ती जुनीच होती.
आता तसे नाहीये सायकलचा मुख्यत्वेकरून वापर हा व्यायाम म्हणून होतो पण मग कोणती सायकल घ्यावी असा प्रश्न बह्तेकांना पडतो कारण दुकानात खुप प्रकाराच्या सायकली असतात आणि कोणती घ्यावी हे न कळल्यामुळे आपला खीसा बघून किंवा दुकानदार सांगेल ती सायकल घेतली जाते.
मला असे वाटते की नविन सायकल घेण्यापूर्वी सायकल संबंधी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे ….....
सायकलचा वापर
१. रेस चालवणे किंवा Long distance cycling
२. व्यायाम किंवा फिटनेस करता कोणतीही सायकल चालते
३.कामावर जाण्यासाठी
सायकलचे प्रकार
सायकलचे ४ मुख्य प्रकार आहेत
.माउंटन बाइक



 ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१.जाड आणि रूंद टायर ज्यांचा उपयोग डोगराळ रस्त्यांवर तोल सांभाळण्यासाठी होतो
२.जा्ड फ्रेम
३. दोन्ही किंवा फक्त पुढच्या चाकाला शॉक अबसॉर्बर


.हायब्रीड बाइक

 डांबरी रस्त्यांवर चालविण्यासाठी किंवा ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१. वजनाला हलकी
२. मध्यम आकाराचे टायर
.रोड बाइक

 सायकल शर्यतींसाठी किंवा long distance सायकलींग साठी
वैशिष्टे
१. वजनाला अतिषय हलकी
२. पातळ आकाराचे टायर
३. खालच्या बाजूला वळलेले विशीष्ट आकाराचे हॅंडलबार

 ४.रोडस्टर बाइक 



रोडस्टर म्हणजे आपण जी नेहेमी चालवत आलो ती सायकल
वैशिष्टे
 मड्गार्ड, कॅरीअर घंटा लावता येते ,कमी किंमत आणि
मुख्य म्हणजे दणदणीत आणि मजबूत असते .


दुकानात आपल्याला अनेक प्रकारच्या सायकलींचे पर्याय  उपलब्ध असतात आणि बहुतेक दुकानदार सायकल खरेदी करण्यापूर्वी Ride  घेउन देतात आणि सायकल खरेदी करण्यापूर्वी नक्कीच चालवून बघावी.
 
 
सायकल खरेदी करण्यापूर्वी  खाली दिलेल्या वेबसाईटना जरूर भेट द्या
 
 http://www.bikeszone.com
www.cyclists.in/
www.sheldonbrown.com/

Wednesday, November 03, 2010

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

ब्लॉगला भेट देणार्‍या सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

Wednesday, October 06, 2010

बिग बॉस,पाकीस्तानी कलाकार आणि आपण

आपल्या देशाला त्रास देण्याची एकही संधी न सोडणार्‍या ,आपल्यावर अतिरेकी हल्ले करणार्‍या आणि भारतात अशांतता माजेल याच्याच प्रयत्नात असलेल्या पाकीस्तानातील दोन भंगार कलाकार बिग बॉस मधे हवेतच कशाला!!! 

त्यांना इथे आणून आमचे मनोरंजन होईल असे बिग बॉस च्या निर्लज्ज निर्मात्यांना वाटत असेल ... तर त्यांचा TRP खाली आणणे हे आपल्या नक्कीच हातात आहे.

नालायक पाकिस्तानी येथे नकोत पण त्याबरोबर कसाब तसेच टायगर मेमन सारख्या देशद्रोही अतिरेक्यांचे वकीलपत्र घेणाऱ्या अब्बास काझमी यालाही या कार्यक्रमातून काढले पाहिजे. अब्बास काझमी, हेडलीला मदत करणाऱ्या राहुल भट यांना प्रसिद्धी देणे म्हणजे सर्व भारतीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याप्रमाणे आहे. असे कार्यक्रम पाहणे म्हणजे आपणच देशविघातक प्रवृतींना खतपाणी घातल्या सारखे होणार आहे.
सुरुवात आपण हा कार्यक्रम न पाहून व अशा वाहिनीवर बहिष्कार टाकून करूयात.
 

जयहिंद!!!

Wednesday, September 29, 2010

कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीतील स्टेडीयम

कॉमनवेल्थ गेम्स वरून बरीच बोम्बाबोम्ब चालू आहे त्यातील भ्रष्टाचाराबद्दल आणि एकंदरीत तेथील कामांच्या दर्जाबद्दल आप्ण खुप काही ऐकले बघीतले आहे

मी नुकतेच तेथील स्टेडीयमचे काही फोटो पाहीले आणि मला असे वाटते की तेथे चांगली कामेसुद्धा झालेली आहेत पण त्यांना योग्य प्रसिद्धी मिळालेली नाही







त्यातील काही फोटो मी येथे पोष्ट केले  आहेत
मला असे वाटते की काय झाले यापेक्षा काय दिसते आहे हे महत्वाचे आहे
तसेच कॉमनवेल्थ  स्पर्धा यशस्वी झाली तर आपल्या देशाची प्रतीमा मलीन होणार नाही
याचा प्रत्येकाने विचार केला पाहीजे.
भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे उद्योग यावर कॉमनवेल्थ  स्पर्धा संपल्यावर चर्चा आणि कारवाई करता येइल आजतरी  कॉमन वेल्थ स्पर्धा यशस्वी करणे ऎवढेच बघायला हवे

Tuesday, September 14, 2010

रुपया गेला कुठे????

रुपया गेला कुठे????
तीन माणसे एका दुकानात जातात
त्यांना एक वस्तू खरेदी करायची असते ,दुकानातील नोकर त्यांना ती दाखवतो
वस्तुची किंमत असते ३०रुपये.
 दुकानातला नोकर त्यांच्याकडून रु.३०/= घेतो.
तिघेजण प्रत्येकी १० रुपये देतात.
थोड्या वेळाने मालक आल्यावर नोकर त्यांला ते पैसे देतो आणि सांगतो कि मी अमुक अमुक वस्तु ३० रुपयांना विकली. मालक म्हणतात अरे त्याची किंमत २५ रुपयेच आहे तू ५ रुपये जास्त घेतलेस.  तेंव्हा हे ५ रुपये  घे आणि त्यांना देउन ये.
नोकर मनात म्हणतो कशाला त्यांना परत द्यायला हवेत पाचच्या पाच मग तो बाहेर जातो २ रुपये खिशात घालतो आणि  ३रुपये त्याना नेउन देतो. 
ते तिघे प्रत्येकी १ रुपया वाटुन घेतात  ,
म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले म्ह्यणजे तिघांचे २७ रुपये झाले ,
नोकराने २ रुपये घेतले
म्हणजे एकूणझाले २९ रुपये 
मग  राहीलेला रुपया गेला कुठे????
बघा सापडतोय का???

Sunday, August 29, 2010

याला उत्तर काय ?

याला उत्तर काय ?
सहजच चाललेल्या गप्पांच्या ओघात एका मित्राने दोन घटना सांगीतल्या 
 प्रायमरी तल्या एका शिक्षिकेने  मुलांना निबंध लिहायला सांगीतला .
विषय होता मला काय /कोण व्हावयाचे आहे आणि देवाकडे तुम्ही काय मागाल.
सायंकाळी घरी गेल्यावर त्या एकेक नि्बंध तपासत होत्या ्तपासून झाल्यावर त्यांनी बाजूला ठेवलेला एक निबंध पुन्हा वाचायला घेतला ,त्याचे पती जेंव्हा घरी आले आणि त्यांनी बायकोला विचारले अग का रडते आहेस ? न बोलता बायकोने ती वही नवर्‍याच्या हातात ठेवली म्हणाल्या हे  वाचा जरा माझ्या एका विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध आहे
" देवा मला टिव्ही कर मला टिव्हीची जागा घ्यायची आहे त्याच्यासारखे व्हायचे आहे  म्हणजे माझी मला एक जागा मिळेल घरातले सगळे माझ्या अवती भवती असतील, मी काय सागतोय त्याकडे कान देउन ऐकतील मी बोलत असताना मला कोणीही थांबवणार नाही टिव्हीकडे जसे सगळे कायम लक्ष ठेउन असतात तस्च माझ्याकडे पण लक्ष देतील बाबा अगदी खूप दमून आले तरी पण माझ्यासमोर बसतील अगदी न कुरकुरता अणि माझी आई काही कारणाने त्रासली असेल ,कंटाळली असेल तरीपण माझ्याजवळ असेल आणि माझे भाउ बहीण माझ्याजळ बसण्यासाठी भांडतील आणि घरातले सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेउन माझ्यासाठी वेळ देतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी माझ्यामुळे घरातले सगळे आनंदी होतील.
देवा मला अजून काही नको मला टिव्ही कर मला सगळे मिळेल
हे वाचून नवरा म्हणाला " बिच्चारा ! कसे आईवडील असतात एकेक! बापरे"
बाई नवर्‍याकडे बघून म्हणतात "आपल्याच मुलाने लिहीलाय हा निबंध"

दुसरी घटना सुद्धा एका शाळेतीलच आहे
मुलांना शिक्षक विचारतात .................
तुम्हाला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे 
कोणाला पायलट व्हायचे असते कोणाला इंजीनीअर, कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, तर कोणाला कारखाना काढायचा असतो ..प्रत्येकाला काहीतरी  व्हायचे असते एक मुलगा मात्र जे सांगतो ते ऐकून शिक्षक थक्क होतात.
तो मुलगा म्हणतो "मला व्हिलन व्हायचे आहे"
शिक्षक भांबावतात पण विचारतात "काय रे बाबा काय डोकं ठिकाणावर आहे ना?
मुलगा " सर ,कोणत्याही सिनेमात अख्खा पिक्च्रर संपेस्तोवर 
व्हिलन मज्जा करत असतो आणि हिरोची मात्र धुलाई होत असते. एव्हढेच कशाला रामायणात सुद्धा रामाला कायम त्रास आहे आणि रावण तर काय मजाच करत असतो .सीतेला पळवून नेतो तिला त्रास देतो. एव्हढा दुष्ट असून सुद्धा मेल्यावर स्वर्गात जातो कारण त्याला रामाने म्हणजे देवाने मारलेले असते"
 समाजाची चूक का आईवडीलांची चूक ?
बरोबर काय आणि चूक काय कोणी आणि कसे ठरवायचे ?

Tuesday, August 10, 2010

बेवारस नाते -डॉ. सुवर्णा नेने

ही कविता पुण्यातील सुप्रसिद्ध Implantologist  डॉ. सुवर्णा नेने यांनी केलेली आहे.
त्यांच्या दंतवैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानाचाआणि त्यांच्या कौशल्याचा लाभ त्यांच्या हजारो पेशंटना मिळतच असतो, पण त्या उत्तम कविताही करतात हे मला माहीत नव्हते.
त्याची ही कविता "बेवारस नाते" माझ्या ब्लॉगवर टाकण्यास  परवानगी दिल्याबद्दल मी  त्यांचा अत्यंत आभारी आहे ही कविता त्यांच्या Clinic मधे त्यांनी लावली होती  त्यांचे लेखन कौशल्य यानिमीत्ताने सर्वांनाच दिसेल
"बेवारस नाते"
रस्त्यावरच्या त्या बेवारस कुत्र्याला,
कळणारच नाही कधि आत्ता..............
की त्याने हक्क वगैरे मागायचे नसतात !
ना कधि झोकून देउन प्रेम करायचे असते !
केंव्हातरी शिळा भाकरतुकडा फेकणार्‍या,
Socalled मालकाला विचारायचे तर नसतेच,
आज तुकडा का नाहे म्हणून?

त्याने स्विकारायचे असते फक्त सत्त्य !
Convienience चे उष्टे वाळके तुकडे !
Inconvienence मुळे पेकाटात बसलेल्या !
सणसणीत लाथेसारखेच निर्लज्जपणे !
उगीच भाकरी टाकणार्‍याला,
मालक वगैरे........... मानायचे नसते !
’ना त्याच्या भरधाव  गाडीमागे,
छाती फुटेपर्यंत पळायचे असते !

पण कळलेच नाही त्या वेड्याला!
जगात दिसते तसे काहीच नसते!
भरधाव गाडीने उडवुन रस्त्यावर !
गतप्राण झाल्यावरही,
त्याला कढिच उमगणार नसते
सामाजीक बांधीलकीत जखडलेल्या
त्या Socalled पांढरपेशा मालकाला,
उगीच हळहळून त्या बेवारश्याशी
असलेले नाते
आता जगजाहीर करणे
Convienient नसते !

डॉ. सुवर्णा नेने

Wednesday, June 09, 2010

बेवड्याची प्रतीज्ञा

बारच
माझा देश आहे
...
सारे
बेवडे माझे बांधव आहेत.
माझ्या
ब्रॅंडवर माझे प्रेम आहे.

बारमधिल
सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मी मान ठेविन.

माझ्या
बारमध्ये आनंदाने आणी विविधतेने झुलणारया बेवड्यांचा
मला अभिमान आहे.

माझा
बार आणी माझी दारू यातच माझी सौख्य सामावलेले आहे.

जय
दारू

चला पटकन एक पेग मारू

Monday, May 17, 2010

मोनालिसा --म्युझियम बंद झाल्यावर मोनालिसा


altम्युझियम बंद झाल्यावर मोनालिसा काय काय करतेय ते बघाच
 
हे कोणी जमवलय ते मला माहीत नाही