Sunday, December 25, 2022

Merry Christmas


 

Thursday, August 05, 2021

 

आमचीही वारी 



वारी म्हटले की विठ्ठलाचं नामस्मरण, पायी चालणें ,टाळ असेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं .पण मी वारीकडे वेगळ्याच नजरेने पाहते ..दर  वर्षी ताई व ताईंच्या मैत्रिणी ,म्हणजे माझ्यापण तायाचं म्हणाना पुण्याला आमच्या घरी येऊन वारीसाठी पायी जायच्या . सहज एकदा ताई म्हणाल्या "तू पण चल ना आमच्याबरोबर "पण मी आढेवेढे घेत "नको हो ताई मला नाही जमणार " असं म्हटलं ..पण तक्षणी ताईने मला प्रोत्साहन देत "चल ग तेव्हढीच मजा " म्हटल्यावर आमची स्वारी नकार बाजूला सारत,मनाचा हिय्या करुन वारीसाठी तय्यार झाली . मग माझ्याबरोबर माझ्या काही मैत्रिणी पण वारीत सामील झाल्या .

 

खरं सांगायच  तर  मी कधी वारीला जाईन असं स्वप्नातहि वाटलं नव्हतं .आमच्या ताईंची कृपाचं म्हणांना .दादा आणि अनिलकाका वारीचं इतके सुंदर नियोजन करायचे सगळ्यांची  जातीने काळजी घ्यायचे . त्यांचा दोघांचा केवढा तो उत्साह असायचा दोघांचेही  कौतुक करावे तेवढे थोडंच .

आमचं वारीला जाणं  म्हणजे एक मस्त ट्रिपचं व्हायची सगळेच देहभान विसरून समरसून जायचो , गप्पागोष्टी ,गमती जमाती खाण्यापिण्याची रेलचेल यामध्ये कितीही चालणें झाले तारि दमलोय असं वाटत नव्हतं .दरवर्षी वारीला जाताना आमच्या उत्साहाला उधाण यायचं ..या वारीच्या निमित्ताने आम्ही सगळे इतके जवळ आलो की आमचं एक कुटुंबच तयार झाले.

 दरवर्षी जुलै महिना कधी येतोय आणि आमची वारीची तारीख कधी ठरतेय याकडे  आमचे डोळे लागून राहायचे .पण म्हणतात ना सरळसोट ,नित्यनेमाने कुठलीही गोष्ट झालेतर अजून काय पाहिजे ?

 एक वर्ष पाऊसपाणी नंतर कोरोनाचे सावट जणू आमच्या वारीला गालबोटच लागलं आणि वारी थांबली .

आता बघूया देवाच्या मनात काय आहे ते?

 परत सर्व काही सुरळीत होईल आणि आपण सर्वजण परत भेटू आणि वारीला नक्की जाऊ अशी  आशा करूयात . मी प्रत्येक वेळी खूपच enjoy केली वारी . आता माझे लांबलेले पुराण संपवते ,नाहीतर तुम्ही वाचून कंटाळून जाल . शेवटी एव्हढच म्हणेन ,देवाच्या मनात असेल तर आपली वारी पुन्हा सुरु होईल आणि आपण सगळे तेव्हढ्याच  उत्साहाने वारीत खारीचा वाटा घेऊन सहभागी होउ .जर आले देवाजीच्या  मनी.....................................

सौ विणा जोशी 

Saturday, July 31, 2021

बदक


 

बदक 

माझा मित्र, देवेन भावे, याने त्याच्या शाळेतल्या शिक्षकांवर  केलेली उपहासात्मक कविता 


ती केसाच्छादित काया

ती भावशून्य बुब्बुळे.....

तो पिंपळखोडासम बांधात   

ते मुखवैभव बावळे........... 


ती बदकसदृश  पाउलें 

डोक्यावर बाभळ बहरे......

ती भुईकोटासम कंबर 

बलरहित बाहू फुरफुरे.......


हे रुप तुझे साजिरे

पुरुषी परि लाजरे...............

विद्वत्तेला तुझिया

उपमाच न दिलेली बरे..........


Wednesday, October 16, 2019

These are some of my video creations

1. Enter a locked car




2. Don't use a phone while crossing a railway track

 

Sunday, September 15, 2019

अंधश्रद्धा

पितृपक्षात कोणतेही शुभकार्य करत नाहित ,नविन खरेदी करत नाहित . 
का ?
तर म्हणे तो काळ वाईट असतो ,

कारण या काळत तुमची पितरे जेवायला येतात .
आता मला सांगा पितरे म्हणजे तुमचे पूर्वज येणार असतील, तर त्यात वाईट काय आहे ?

बर आदल्या दिवसापर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरातच असतो
त्या सुखकर्त्याने तुम्हाला भरपूर आशिर्वाद दिलेला असतो.
तरीपण हा काळ वाईट का ?
माझ्या मते हि फ़क्त अंधश्रद्धा आहे , बाकि काही नाही

Friday, March 03, 2017

बॅंकेतून पैसे काढण्यावरील बंधने

काही खाजगी बॅंकांनी पैसे काढण्यावर बंधने घातली आहेत.
थोड्या दिवसांनी सरकारी बॅंका सुद्धा अशीच बंधने घालतील.
महिन्यात ४ वेळाच पैसे काढता येतील त्याहुन जास्त वेळा काढल्यास प्रत्येक वेळी रु १५०/= दंड होइल.

माझ्या खात्यातील पैसे माझे आहेत आणि माझ्या कष्टाचे आहेत.
मला लागतील तसे मी पैसे काढतो त्यावर बंधन का?
हा प्रश्न मनात येतो कारण बॅंका म्हणतात की थे बंधन काळा पैसा रोखण्य़ासाठी आहे
आणि कॅशलेस व्यवहार वाढावे म्हणून आहे
बरेच लोक म्हणतात की हे बरोबरच आहे कारण त्यांची कल्पना झाली आहे की
रोख पैसा म्हणजे काळा पैसा आणि काळा पैसा बाळगणारा देशद्रोही.
म्हणजे चार वेळा पैसे काढणारा देशभक्त आणि पाच वेळा पैसे काढणारा देशद्रोही
भारी लॉजीक आहे.
मला गरज आहे तेव्हढेच पैसे मी काढत असेन तर त्यात चूक काय आहे.
फ़क्त ४ वेळाच पैसे काढता येतील अन्यथा रु.१५०/= दंड याचे खरे कारण आहे बॅंकांना काहीतरी करुन तुमच्या कडुन पैसे उकळायचे आहेत एव्हढेच......



Thursday, November 17, 2016

१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न



१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न  
१.राजकारणि आणि सरकारी अधिकारी वर्ग लाच मागणे बंद करतील का?
२.राजकिय पक्ष निवडणुकित नोटांच्या ऐवजी धनादेश वापरतील का?
३.उद्योगपती आणि राजकारणि सर्व प्रकारचे कर इमानदारीने भरतील का?
४.कोणत्याही  कामासाठी नोकरशहा पैसे खातात हे बंद होइल का ?
५.बांधकाम क्षेत्रात बदल होउन बिल्डर लोक नोटा देउन बांधकाम नियमावलिला बगल देणे बंद करतील का ?
६. सिग्नलला लपून सामान्य नागरिकांना   दंडाचा धाक दाखवून पैसे उकळणारे  पोलिस चौकात उभे राहुन वाहतुक नियंत्रण करतील का?  
७.दंडाचा धाक दाखवून पैसे उकळण्य़ाऐवजी पोलिस पावती फ़ाडतील का ?
८. याचबरोबर सतत वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक शिस्तीत वाहने चालवतील का? सतत पोलिसांना नावे ठेवण्यात अर्थ नाही आपणही नियम पाळलेच पाहिजेत
९. बहुतेक राजकारणि लक्षावधी रुपयांच्या गाडीतुन हिंडताना दिसतात ,मोठ्या बंगल्यात राहतात पण कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करतान दिसत नाहित हे थांबेल का ?


हे थांबले नाही तर कोणत्याही नोटा काळ्याच होणार