आपल्या देशाला त्रास देण्याची एकही संधी न सोडणार्या ,आपल्यावर अतिरेकी हल्ले करणार्या आणि भारतात अशांतता माजेल याच्याच प्रयत्नात असलेल्या पाकीस्तानातील दोन भंगार कलाकार बिग बॉस मधे हवेतच कशाला!!!
त्यांना इथे आणून आमचे मनोरंजन होईल असे बिग बॉस च्या निर्लज्ज निर्मात्यांना वाटत असेल ... तर त्यांचा TRP खाली आणणे हे आपल्या नक्कीच हातात आहे.
नालायक पाकिस्तानी येथे नकोत पण त्याबरोबर कसाब तसेच टायगर मेमन सारख्या देशद्रोही अतिरेक्यांचे वकीलपत्र घेणाऱ्या अब्बास काझमी यालाही या कार्यक्रमातून काढले पाहिजे. अब्बास काझमी, हेडलीला मदत करणाऱ्या राहुल भट यांना प्रसिद्धी देणे म्हणजे सर्व भारतीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याप्रमाणे आहे. असे कार्यक्रम पाहणे म्हणजे आपणच देशविघातक प्रवृतींना खतपाणी घातल्या सारखे होणार आहे.
सुरुवात आपण हा कार्यक्रम न पाहून व अशा वाहिनीवर बहिष्कार टाकून करूयात.
जयहिंद!!!