बॉम्बस्फोट, टिव्ही चॅनेल आणि आपले माननिय (राजकारणी)
परवा संध्याकाळी टिव्ही बघत असताना अचानक पुण्यात
छोटा बॉम्बस्फोट अशी बातमी दिसली .
चॅनेलवर स्फोटाच्या जागी गेलेले त्यांचे प्रतिनीधी बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत माहिती देत होते आणि टिव्हीवर तिचं तिचं द्रुष्ये
दाखवत असतानाच तेथे आलेल्या पोलीस कमिशनर साहेबांना चॅनेलवाले प्रश्न विचारत होते त्याच
वेळी एका बाजूला माननियांची गर्दी होऊ लागली.
पोलीस कमिशनर साहेब गेल्यानंतर चॅनेलवाल्यांनी ताबडतोब आपला कॅमेरा आणि माईक त्यांच्याकडे वळविला आणि पुण्यातील माननियांच्या मुलाखती दाखवण्यास सुरूवात केली.
चॅनेल-
हा दहशतवाद्यांचा हल्ला आहे असे आपल्याला वाटते का?
माननीय-
अं अं
चॅनेल
- हा स्फोट कोणी केला असेल असे आपल्याला वाटते?
माननीय-
मला असे वाटते की ………………
चॅनेल-
आपण पुणेकरांना काय सांगाल?
माननीय—अं
!! अं !! आमच्या पक्षाचा कार्यक्रम इथेच बालगंधर्व मधे होता आणि आपले मा.-अमुक अमुक
इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आत असतानाच आम्हाला फोन आला आणि मग आम्ही सर्वच ( मा. अमुक
अमुक तमुक तमुक ….नेत्यांच्या नावांची मोठ्ठी यादी…..)धावतच बाहेर आलो आणि आत्ताच आपल्या पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितले आहे की “घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही पुढील तपास चालू आहे आणि पुणेकरांना
आमची विनंती आहे कृपया अफवा पसरवू नका ” वगैरे वगैरे
पुन्हा एकदा तेच पाल्हाळ वेगवेगळ्या माननियांनी लावले
होते .
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पॉझ आणि पोझ घेवून अं अं करत बोलत होते प्रत्येकजण आपण आपल्या
वरिष्ठांना ही बातमी कशी दिली ह्याची सुद्धा माहीती देत होता.
ह्या मुलाखतीची खरोखरच गरज असते का?
लागोपाठ वेगवेगळ्या माननियांनी तिथे येण्याची खरोखरच
गरज होती का?
पोलीस कमिशनरसाहेबांनी मुलाखत दिल्यानंतर माननियांना
हे प्रश्न विचारण्याची काही गरज आहे का?
आणि आपण राजकारणात आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीत
नाक खुपसायला हवेच का??