नवी गुलामगिरी
आपल्या
देशावर १५० वर्षे ब्रिटीशांनी
राज्य केले , १५० वर्षे
आपण गुलामगिरीत काढली.
ब्रिटीश(गोरे)
लोक भारतात आले ते
व्यापार करण्यासाठी आणि नंतर
त्यांनी हळुहळु देशाचा ताबाच
घेतला त्यांनी आपले पाणी जोखलं
होते अणि"“Divide & Rule” चा
वापर करून त्यांनी आपल्यात
दुही माजवली आणि आपल्याला
गुलाम बनवले. राज्यकारभार
चालवण्यासाठी त्यांनी गोरे
लोक ठेवले होते पण खालच्या
स्तरावर मात्र भारतीय लोकच
होते.
हे असे का झाले कसे झाले
हा या लेखाचा विषय नाही त्यावर
भरपूर माहिती अनेक जागी उपलब्ध
आहे
ब्रिटीश(गोरे)
लोक जाउन आता ६४ वर्षे
झाली आहेत आणि आपण पूर्णपणे
स्वतंत्र आहोत पण आपण पुन्हा
एकदा स्वतःहून एका वेगळ्या
प्रकारच्या गुलामगिरी कडे
वाटचाल करत आहोत असे मला वाटते
भारतीय
लोकांना परदेशी वस्तूंचे
आकर्षण आहे हे गोर्या लोकांनी
ओळखले आहे ,त्यामुळे
इथे येऊन सत्ताधारी होवून
राज्यकारभार हाकण्यात त्यांना अजिबात रस नाही ते व्यापारी
आहेत आणि आपला माल जास्तीत
जास्त किमतीला खपवून नफा
कमावणे एव्हढाच त्यांचा उद्देश
आहे.
यापुढे परकीयांना आपल्यावर आक्रमण
करून अथवा युद्ध करून देश
ताब्यात घ्यायची गरजच नाही.
आर्थिक गुलामगिरी
आपण स्वतःहून ओढवून घेत आहोत.
आपण जरा
निट विचार केला तर लक्षात येईल
की आपण वापरत असलेल्या निम्म्याहून
अधिक वस्तू या परदेशात तरी
बनवलेल्या आहेत किंवा परदेशी
कंपन्यांनी भारतात बनवलेल्या
आहेत .
ह्या लेखाचा
उद्देश स्वदेशी वापराचा संदेश
देणे असाही नाही.
आपल्या
घरात असलेल्या बर्याच वस्तू
परकीय बनावटीच्या असतात टिव्ही
,फ्रिज ,मिक्सर
मोबाईल
किंवा लॅंड्लाईन फ़ोन.
कॉम्प्युटर. ,गाड्या,
दुचाक्या वगैरे...
आपल्याकडे
मोबाईल फोन बनतच नाहीत त्यामुळे
सर्वच्या सर्व मोबाईल परकीय
बनावटीचेच असतात कॉम्प्युटरची
आपल्याकडे जुळणी होते त्यातले
एलेक्ट्रॉनिक पार्ट परदेशातूनच
येतात किंवा भारतात बनत असले
तरी परदेशी कंपनीच्या कोलॅबरेशन
मधेच बनत असतात
आणि वर
उल्लेख केलेल्या वस्तू जरी
भारतात बनत असल्या तरीसुद्धा
त्यात वापरलेले स्पेअर्स
परदेशातूनच येत असतात
….प्रत्येकाने
पहिला फोन घेतल्यानंतर या ना
त्या कारणाने दोन तिनदा तरी
नवा फोन घेतलेला असतोच आणि
बरेचसे असे फोन नंतर धूळ खात
पडलेले असतात
दर दोन
तीन वर्षांनी गाडी बदलण्याची
खरेच गरज असते का?
अश्या
अनेक वस्तू आपल्याकडे असतात
आणि त्यासाठी आपण महागडे परकीय
चलन मोजलेले असते
गोर्या लोकांनी
भारतीय लोकांची ही गरज ओळखून
आपल्याला अनेक नावीन्यपूर्ण
गॅजेट्स उपलब्ध करून दिली
आहेत आणि ठरावीक काळानंतर
त्यात जरासे बदल करून नवीन
व्हर्जन बाजारात आणले जाते
कारण ते एक मार्केटींग गिमिक
असते. त्यात फार
काही वेगळे असते असे नाही पण
नवे आलेय ना? मग घ्या ते! या
वृत्तीमुळे नव्याची खरेदी
होते
लहान मुले
जशी नवे खेळणे आणले की जुने
टाकून देतात तशी आपल्याकडील
बर्याच जणाची पद्धत झाली
आहे या नवे आले की जुने फेका
वृत्तीतून बरेच परकीय़ चलन
वाया जात आहे असे मला वाटते.
मला एव्हढेच
म्हणायचे आहे की ही वृत्ती
आपण जर बदलली तर आपले आर्थिक
स्वातंत्र्य अबाधित राहील