आमचीही वारी
वारी म्हटले की विठ्ठलाचं नामस्मरण, पायी चालणें ,टाळ असेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं
.पण मी वारीकडे वेगळ्याच नजरेने पाहते ..दर
वर्षी ताई व ताईंच्या मैत्रिणी ,म्हणजे माझ्यापण तायाचं म्हणाना पुण्याला आमच्या घरी येऊन वारीसाठी
पायी जायच्या . सहज एकदा ताई म्हणाल्या "तू पण चल ना आमच्याबरोबर "पण मी
आढेवेढे घेत "नको हो ताई मला नाही जमणार " असं म्हटलं ..पण तक्षणी ताईने
मला प्रोत्साहन देत "चल ग तेव्हढीच मजा " म्हटल्यावर आमची स्वारी नकार
बाजूला सारत,मनाचा
हिय्या करुन वारीसाठी तय्यार झाली . मग माझ्याबरोबर माझ्या काही मैत्रिणी पण वारीत
सामील झाल्या .
खरं सांगायच
तर मी कधी वारीला जाईन असं
स्वप्नातहि वाटलं नव्हतं .आमच्या ताईंची कृपाचं म्हणांना .दादा आणि अनिलकाका
वारीचं इतके सुंदर नियोजन करायचे सगळ्यांची
जातीने काळजी घ्यायचे . त्यांचा दोघांचा केवढा तो उत्साह असायचा
दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडंच .
आमचं वारीला जाणं म्हणजे एक मस्त ट्रिपचं व्हायची सगळेच देहभान
विसरून समरसून जायचो , गप्पागोष्टी
,गमती जमाती
खाण्यापिण्याची रेलचेल यामध्ये कितीही चालणें झाले तारि दमलोय असं वाटत नव्हतं
.दरवर्षी वारीला जाताना आमच्या उत्साहाला उधाण यायचं ..या वारीच्या निमित्ताने
आम्ही सगळे इतके जवळ आलो की आमचं एक कुटुंबच तयार झाले.
आता बघूया देवाच्या मनात काय आहे ते?
सौ विणा जोशी