मराठी माणूस आणि व्यवसाय
खरे खोटे मला माहिती नाही पण पुढे सांगीतलेल्या कथेतील घटना अगदिच अशक्य आहे असे मात्र नाही.
एका सरकारी खात्याचे एक टेंडर निघालेले असते , नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्याचे बजेट ठरवलेले असते, की या प्रोजेक्ट्चा खर्च रू.१५ लाख येइल .
अनेक जणांच्या कोटेशन मधून तीन जणांना साहेब चर्चेला बोलावतात .
पहीला येतो आमचा मराठी माणूस...............
साहेब-
आता बघा आमचा अंदाज होता १५ लाखाचा पण तुमचे कोटेशन आहे २० लाखाचे ,सांगा कसे काय करायचे?
सांगा किती कमी करताय?
मराठी माणूस—
हे बघा साहेब जे काय कोटेशन भरले आहे ते अगदी बरोबर आहे यात काही कमी होणार नाही ,आ्म्ही क्वालीटीत काहीही तड्जोड करत नाही, सर्व पार्ट अस्सल वापरतो आमच्याकडे डुप्लिकेट माल वापरत नाही, अहो आमचा ख्रर्चच मुळी १८ च्या घरात जातोय ,त्यामुळे यामधे काहीही कमी होणार नाही.
साहेब –
बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.
यानंतर येतो एक सरदारजी
साहेब-
बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय २५ लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?
२५ लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?
सरदार-
क्या साहबजी समझ लो महंगाइ कितना बढ गया है ,हर चीज का दाम बढ गया है, हमे पता है आपको टाँप क्वालिटी चाहिये ,तो हम भी टाँप क्वालिटी का माल देंगे,और आप्को भी मालूम है आपके ऑफ़ीस मे भी हर जगह देना पडता है
साहेब-
फिर भी हे जरा जास्तच होतात
सरदार-
क्या साहबजी समझ लो आपको भी इसमे दो रखा है
साहेब –
बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.
यानंतर येतो एक मारवाडी
साहेब-
बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय ३० लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?
३० लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?
मारवाडी-
सायेब ते सर्व जरा बाजूला ठेवा आणि आमचे ऐका कोणि काय कोटेशन भरलय आम्हाला सगळं म्हायतीय
आपण असे करा तुम्ही ऑर्डर आमच्या नावाने काढा आम्ही त्या मराठी माणसाकडून काम करून घेतो त्याचे त्याला पैसे देवून टाकतो ,तुम्ही पेमेंट्चे काम त्यवढे लवकर करा ,त्या मराठी माणसाकडून आम्ही १५ लाख देवून काम करून घेतो वरच्या १५ तले निम्मे तुमचे निम्मे आमचे.
पुढे काय झाले ते सांगायला नकोच नाही कां???
मराठी माणुस मागे राहण्याचे अजून एक कारन कळले... सत्याला धरून चालाल तर मागेच राहाल हेही खरे आहे, गांधिजींची तत्त्वे प्रक्टिकल आहेत की नाहीत हेही या गोष्टीतून कळू शकते..
ReplyDelete.
good story
ब्लाँगला भेट दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार
ReplyDeleteधन्यवाद
संजय जोशी
Came to your blog while searching for kettlebell in India. Can you please let me know whether you supply kettlebell in Pune and what will be the cost.
ReplyDeleteMy mail address
manoj.augustine@gmail.com
Sanjay.ji Marathi mansabadal sarvatra hech pahavayas bhette. Janu aplya raktat bhinlyasarkhe hech marathipan apan jopasat basto.Pan hyahipeksha mala tumche manogat avadle.Itkya premane swagat karnara manus marathich asu shakto..ha ek changla gun aplyat ahe.hehi nase thodke. Internetchya duniyet me nava ahe.tyamule engrajimadle he dhegujri marathi tumhala vachave lagte ahe.
ReplyDeleteSHARAD.
श्री शरद,
ReplyDeleteब्लाँगला भेट दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार
आपण म्हणता ते बरोबर आहे पण हल्ली मराठी माणसांत बराच बदल होतो आहे असे वाटते आहे.
चिकाटी, धाडस आणी काम करायची तयारी असेल तर आपणही धंदा व्यवसायात यशस्वी होऊ शकतो.
आपणसुद्धा मराठीत नक्कीच लिहू शकाल www.baraha.com/ ह्या वेबसाईट्वरून आपण सॉफ्ट्वेअर डाउनलोड करा फार सोपे आहे
धन्यवाद
संजय जोशी
स्वभाव - मंगेश पाडगावकर
ReplyDeleteएक गरीब मारवाडी
घेउन आला लॊटा,
शहरात येउन नंतर
शेठ झाला मॊठा,
एक घनिक मराठी
सोने घेउन गेला,
आणि परत येताना
लोटा घेऊन आला !
Dilip Patwardhan
अगदी योग्य आहे
ReplyDelete