Tuesday, September 14, 2010

रुपया गेला कुठे????

रुपया गेला कुठे????
तीन माणसे एका दुकानात जातात
त्यांना एक वस्तू खरेदी करायची असते ,दुकानातील नोकर त्यांना ती दाखवतो
वस्तुची किंमत असते ३०रुपये.
 दुकानातला नोकर त्यांच्याकडून रु.३०/= घेतो.
तिघेजण प्रत्येकी १० रुपये देतात.
थोड्या वेळाने मालक आल्यावर नोकर त्यांला ते पैसे देतो आणि सांगतो कि मी अमुक अमुक वस्तु ३० रुपयांना विकली. मालक म्हणतात अरे त्याची किंमत २५ रुपयेच आहे तू ५ रुपये जास्त घेतलेस.  तेंव्हा हे ५ रुपये  घे आणि त्यांना देउन ये.
नोकर मनात म्हणतो कशाला त्यांना परत द्यायला हवेत पाचच्या पाच मग तो बाहेर जातो २ रुपये खिशात घालतो आणि  ३रुपये त्याना नेउन देतो. 
ते तिघे प्रत्येकी १ रुपया वाटुन घेतात  ,
म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले म्ह्यणजे तिघांचे २७ रुपये झाले ,
नोकराने २ रुपये घेतले
म्हणजे एकूणझाले २९ रुपये 
मग  राहीलेला रुपया गेला कुठे????
बघा सापडतोय का???

10 comments:

  1. Thanks for sharing this...
    I had asked this puzzle in my childhood to everyone and confused them...
    somehow i wasnt able to recollect the entire puzzle ... Many thanks for sharing.

    -- PM

    ReplyDelete
  2. छान गोंधळ घातलाय.
    या गणितामध्ये जेथे वजाबाकी करायची तेथे बेरीज केली जात आहे. हाच खरा घोळ आहे.
    त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले म्ह्यणजे तिघांचे २७ रुपये झाले ,
    त्यापैकी नोकराने २ रुपये खाल्ले.
    आणि २५ रुपयाची वस्तू २७ रुपयात त्यांच्या मस्तकी मारली.
    (१०+१०+१०-५+२)=२७/३=९
    म्हणजे एकूण झाले २५+२=२७ रुपये
    किंवा ३०-३=२७-२=२५
    मग १ रुपयाचा प्रश्न येतोच कुठे????

    ReplyDelete
  3. म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले...
    ही ओळ चुकीची आहे...कारण तिघांनी प्रत्येकी ८ रुपये न देता एकूण २५ रुपये ( १ रुपया जास्त दिला होता) दिले होते. म्हणून १ रुपया चा फरक वाटतो.

    ReplyDelete
  4. 25/3 - म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी 8.3333 Dile

    mag 1 Rupee parat aala - i.e. 8.33 +1.00 = 9.33

    म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९.३३33 रुपये दिले

    ReplyDelete
  5. @Gangadhar Mute
    "काहीच गोंधळ नाहीये यात."
    प्रत्येकाचे खर्च किती झाले
    तर ९ रुपये ,तिघांचे मिळून झाले २७ रुपये नोकराने घेतले २ रुपये म्हणजेच एकूण झाले २९ रुपये
    @Sagar
    "म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले ही ओळ चुकीची आहे......"
    त्यांनी प्रत्येकी ९ रुपयेच दिले आहेत आणि नोकराने २ रुपये घेतलेच आहेत
    @Prasanna
    "म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९.३३33 रुपये दिले........."
    तिघांनी प्रत्येकी ९ रुपयेच दिले आहेत कारण आधी दिलेल्या १० रुपयातील एकेक रुपया त्यांना परत मिळालेला आहे

    ReplyDelete
  6. वस्तुची किंमत २५ रुपये, आकारली गेलेली किंमत ३० रुपये. नोकराने २ रुपये घेतले आणि ३ रुपये परत केले म्हणजे आकारलेली किंमत ३०-५+३= २८ आणि २ रुपये नोकराच्या खिशात.

    ReplyDelete
  7. हा घ्या तुमचा रुपया ... उगाच भांडू नका
    http://www.cuisinecuisine.com/images/re1note.jpg

    ReplyDelete
  8. @Gaurav
    त्यांनी प्रत्येकी ९ रुपयेच दिले आहेत आणि नोकराने २ रुपये घेतले आहेत
    @ Prasik
    वाः वाः हे मात्र आवडले

    ReplyDelete
  9. हा सगळा शब्दांचा खेळ आहे.
    तिघांनी दिले ९ x ३ = २७
    नोकरानी ठेवले २
    दुकामदाराला मिळाले २५.

    आता हेच वेगळ्या प्रकारे
    ३० पैकी हातात आले २७ नोकरकडे राहिले २ एक गेला कुठे.
    तर तो १ आहे तिथेच आहे.

    ReplyDelete