Thursday, August 18, 2016

ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत- साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधु # Rio Olympics #Sakshee Malik # PV Sindhu

झोंबरे वास्तव
ज्या देशात कुंभमेळ्यातील भुक्कड साधूंवर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त खर्च होतो , त्या देशाने खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा ठेवु नये.
खेळात भाग घेणे आणि प्रेक्षकांची मने जिंकणे हे पदकापेक्षा जास्त महत्वाचे आहे असे ज्या देशात सांगितले जाते त्या देशाला पदके कशी मिळणार ?
ज्या देशातील क्रिडा संघटनांचे प्रमुख कोणताही खेळ न खेळता केवळ त्यांच्या राजकिय संबंधांमुळे वर्षानुवर्षे या संघटनांवर राज्य करतात
आणि
जोपर्यंत या संघटनांवर मरायला टेकलेली म्हातारी गिधाडे बसलेली आहेत तोपर्यंत Olympic मधे आपली प्रगती होणे अवघड आहे.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी दोन मुलिंनी भारताची लाज राखली 
सकाळी साक्षी मलिकने महिला कुस्तीतले पहिले  ब्रॉंझ पदक मिळवले
आणि रात्री सिंधुने सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे.

यात दोघींच्या घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या गुरूंनी दिलेले प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे.
दोघींच्या जिद्दीला सलाम

1 comment:

  1. दोघींच्या जिद्दीला माझासुद्धा सलाम!

    ReplyDelete