काही
खाजगी बॅंकांनी पैसे काढण्यावर
बंधने घातली आहेत.
थोड्या
दिवसांनी सरकारी बॅंका सुद्धा
अशीच बंधने घालतील.
महिन्यात
४ वेळाच पैसे काढता येतील
त्याहुन जास्त वेळा काढल्यास
प्रत्येक वेळी रु १५०/= दंड
होइल.
माझ्या
खात्यातील पैसे माझे आहेत
आणि माझ्या कष्टाचे आहेत.
मला
लागतील तसे मी पैसे काढतो
त्यावर बंधन का?
हा
प्रश्न मनात येतो कारण बॅंका
म्हणतात की थे बंधन काळा पैसा
रोखण्य़ासाठी आहे
आणि कॅशलेस व्यवहार वाढावे म्हणून आहे
बरेच
लोक म्हणतात की हे बरोबरच आहे
कारण त्यांची कल्पना झाली
आहे की
रोख
पैसा म्हणजे काळा पैसा आणि
काळा पैसा बाळगणारा देशद्रोही.
म्हणजे
चार वेळा पैसे काढणारा देशभक्त
आणि पाच वेळा पैसे काढणारा
देशद्रोही
भारी
लॉजीक आहे.
मला
गरज आहे तेव्हढेच पैसे मी काढत
असेन तर त्यात चूक काय आहे.
फ़क्त
४ वेळाच पैसे काढता येतील
अन्यथा रु.१५०/=
दंड याचे खरे कारण आहे
बॅंकांना काहीतरी करुन तुमच्या
कडुन पैसे उकळायचे आहेत
एव्हढेच......