दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे!!
दादोजींचा पुतळा हलवणे बरोबर आहे का चूक या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
कारण एक सामान्य माणूस म्हणून मला असे वाटते की प्रत्येक विषयात बोलायचा आपल्याला अधिकार नाही.
पण पुतळा हलविल्यानंतर काल आमच्या महानगरपालिकेत माननियांनी जो राडा केला ते बघून ह्या असल्या लोकांना आपण निवडून दिलेय ह्याचे नक्कीच दुःख होतेय.
मोड्तोड करून ह्यांना काय मिळाले हेच कळत नाहीये.
एकमेकांच्या ऑफीस ची मोड्तोड करून प्रश्न सुटेल असे ह्यांना वाटतेय का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जनतेची उस्फूर्त प्रतिक्रिया होती.
मग काय जनतेने ह्यांना महानगरपालिकेत राडा करायला, काचा फोडायला,महापौरांची खुर्ची लाथा मारून तोडायला सांगीतले होते?आणि कधी?
माननिय नगरसेवक असेही म्हणाले की भगतसिंहांनीच सांगीतले होते की सरकारला जनतेचा क्षोभ जर ऐकू येत नसेल तर सरकारच्या कानापाशी स्फोट करायला लागतो.
माझी माननियांना विनंती आहे की तुम्हाला काय हवे ते करा पण स्वतःची तुलना भगतसिंहांशी करू नका ते फारच म्हणजे फारच महान होते.
मला या सगळ्या घटनांमुळे काही प्रश्न पडले आहेत.
पुढील काही दिवस ह्या प्रश्नांचा भुंगा मला छळणार आहे असे दिसतेय
उस्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
भावना दुखावणे म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
गोंधळ माजवून आणि राडा करून आणि सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून कोणाचा फायदा होतो?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुढे काय होणार?
Tuesday, December 28, 2010
Saturday, December 18, 2010
नविन सायकल घेताय? मग हे जरूर वाचा........
नविन सायकल घेताय मग हे वाचा...
मी गेली तीन वर्षे नियमीत सायकल चालवत आहे आणि सध्या सायकलींना बरे दिवस आले आहेत असे वाटावे एव्ह्ढ्या सायकली पुण्याच्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत.त्यातसुद्धा साधारणपणे मध्यमवयीन स्त्री पुरुषांचे प्रमाण जास्त दिसते.पूर्वी सायकल ही घरात वर्षानुवर्षे वापरली जाणारी गोष्ट होती आणि स्वयंचलीत वाहने कमी असल्यामुळे सायकल हेच कामावर जाणे ,कॉलेजमधे जाणे यांसाठी मुख्य साधन होते.मी कॉलेजमध्ये असताना रॅलेची साधी सायकल मला वडिलांनी दिली होती आणि मला तिने बरीच वर्षे साथ दिली, आणि ती जुनीच होती.
आता तसे नाहीये सायकलचा मुख्यत्वेकरून वापर हा व्यायाम म्हणून होतो पण मग कोणती सायकल घ्यावी असा प्रश्न बह्तेकांना पडतो कारण दुकानात खुप प्रकाराच्या सायकली असतात आणि कोणती घ्यावी हे न कळल्यामुळे आपला खीसा बघून किंवा दुकानदार सांगेल ती सायकल घेतली जाते.
मला असे वाटते की नविन सायकल घेण्यापूर्वी सायकल संबंधी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे ….....
सायकलचा वापर
१. रेस चालवणे किंवा Long distance cycling
२. व्यायाम किंवा फिटनेस करता कोणतीही सायकल चालते
३.कामावर जाण्यासाठी
१. रेस चालवणे किंवा Long distance cycling
२. व्यायाम किंवा फिटनेस करता कोणतीही सायकल चालते
३.कामावर जाण्यासाठी
सायकलचे प्रकार
सायकलचे ४ मुख्य प्रकार आहेत
१.माउंटन बाइक
१.माउंटन बाइक
ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी
वैशिष्टे
१.जाड आणि रूंद टायर ज्यांचा उपयोग डोगराळ रस्त्यांवर तोल सांभाळण्यासाठी होतो
२.जा्ड फ्रेम
३. दोन्ही किंवा फक्त पुढच्या चाकाला शॉक अबसॉर्बर
१. वजनाला हलकी
२. मध्यम आकाराचे टायर
३.रोड बाइक
सायकल शर्यतींसाठी किंवा long distance सायकलींग साठी
वैशिष्टे
१. वजनाला अतिषय हलकी
२. पातळ आकाराचे टायर
सायकल शर्यतींसाठी किंवा long distance सायकलींग साठी
वैशिष्टे
१. वजनाला अतिषय हलकी
२. पातळ आकाराचे टायर
३. खालच्या बाजूला वळलेले विशीष्ट आकाराचे हॅंडलबार
४.रोडस्टर बाइक
रोडस्टर म्हणजे आपण जी नेहेमी चालवत आलो ती सायकल
४.रोडस्टर बाइक
रोडस्टर म्हणजे आपण जी नेहेमी चालवत आलो ती सायकल
वैशिष्टे
मड्गार्ड, कॅरीअर घंटा लावता येते ,कमी किंमत आणि
मुख्य म्हणजे दणदणीत आणि मजबूत असते .
जेंव्हा आपण सायकलीच्या दुकानात जातो तेंव्हा बहुतेकांच्या पहिल्यांदा नजरेत भरते ती माउंटन बाइक.
मुलांची तर त्यावरून नजरच हटत नाही.जवळ जवळ सर्वच दुकानदार त्यांना ज्यात जास्त पैसे मिळतात त्या सायकल आधी दाखवतात .काही दुकानदार तर ५-६ हजारापर्यंतची सायकल घेणार्याकडे तुच्छ्तेनेच बघतात.आणि सगळेच दुकानदार गिर्हाइकाला यातले काहीही कळत नाही अशा समजुतीत असतात काही प्रमाणात ते खरेही आहे.म्हणूनच आपल्याला काय हवे आहे याची माहीती आधी करून घ्यावी .त्यासाठी इंटर्नेट्वर बर्याच वेबसाईट आहेत.सर्व माहीती उपलब्ध आहे.
मुलांची तर त्यावरून नजरच हटत नाही.जवळ जवळ सर्वच दुकानदार त्यांना ज्यात जास्त पैसे मिळतात त्या सायकल आधी दाखवतात .काही दुकानदार तर ५-६ हजारापर्यंतची सायकल घेणार्याकडे तुच्छ्तेनेच बघतात.आणि सगळेच दुकानदार गिर्हाइकाला यातले काहीही कळत नाही अशा समजुतीत असतात काही प्रमाणात ते खरेही आहे.म्हणूनच आपल्याला काय हवे आहे याची माहीती आधी करून घ्यावी .त्यासाठी इंटर्नेट्वर बर्याच वेबसाईट आहेत.सर्व माहीती उपलब्ध आहे.
दुकानात आपल्याला अनेक प्रकारच्या सायकलींचे पर्याय उपलब्ध असतात आणि बहुतेक दुकानदार सायकल खरेदी करण्यापूर्वी Ride घेउन देतात आणि सायकल खरेदी करण्यापूर्वी नक्कीच चालवून बघावी.
सायकल खरेदी करण्यापूर्वी खाली दिलेल्या वेबसाईटना जरूर भेट द्या
www.cyclists.in/
www.sheldonbrown.com/
Subscribe to:
Posts (Atom)