दुखावलेल्या भावना, राडा ,गोंधळ आणि आपण सामान्य माणसे!!
दादोजींचा पुतळा हलवणे बरोबर आहे का चूक या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
कारण एक सामान्य माणूस म्हणून मला असे वाटते की प्रत्येक विषयात बोलायचा आपल्याला अधिकार नाही.
पण पुतळा हलविल्यानंतर काल आमच्या महानगरपालिकेत माननियांनी जो राडा केला ते बघून ह्या असल्या लोकांना आपण निवडून दिलेय ह्याचे नक्कीच दुःख होतेय.
मोड्तोड करून ह्यांना काय मिळाले हेच कळत नाहीये.
एकमेकांच्या ऑफीस ची मोड्तोड करून प्रश्न सुटेल असे ह्यांना वाटतेय का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जनतेची उस्फूर्त प्रतिक्रिया होती.
मग काय जनतेने ह्यांना महानगरपालिकेत राडा करायला, काचा फोडायला,महापौरांची खुर्ची लाथा मारून तोडायला सांगीतले होते?आणि कधी?
माननिय नगरसेवक असेही म्हणाले की भगतसिंहांनीच सांगीतले होते की सरकारला जनतेचा क्षोभ जर ऐकू येत नसेल तर सरकारच्या कानापाशी स्फोट करायला लागतो.
माझी माननियांना विनंती आहे की तुम्हाला काय हवे ते करा पण स्वतःची तुलना भगतसिंहांशी करू नका ते फारच म्हणजे फारच महान होते.
मला या सगळ्या घटनांमुळे काही प्रश्न पडले आहेत.
पुढील काही दिवस ह्या प्रश्नांचा भुंगा मला छळणार आहे असे दिसतेय
उस्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
भावना दुखावणे म्हणजे नक्की काय असा मला प्रश्न पडला आहे.
गोंधळ माजवून आणि राडा करून आणि सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून कोणाचा फायदा होतो?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुढे काय होणार?
श्री संजय जोशी,
ReplyDeleteआपल्या मताशी मी सहमत आहे.देशाची मालमत्ता हि आपल्या बापाची आहे हे समजणे चूक आहे.
धन्यवाद,
अभय बहिरट
Dear Sanjay,
ReplyDeleteTotally agree with you.
As for the last question I can only see darkness ahead and it makes me feel that I should have been sterilized before marriage. Anyway I hopefully wont be alive to see the future!!!
Ulhas
Dear Sanjay ,
ReplyDeleteThis is the lot of an " aam aadmi " .
Probably a bloody revolution may correct the situation . But then , are we capable of one ?
Sudhir
thats why wise pune residents elected these all idiots for the pmc,sothat got !there and do what ever u want to do,pl. spare us because we are all day busy & intelligent enough with our work & some are just trying to get their daily bread & butter. just go to hell. the question again remains un answered for the years that where we are going with science& rech,prosperity? do we really bother what happens if dadoji statue is there or not? definitely not!!!!!
ReplyDeleteNICELY WORDED & MOST APPROPRIATE OBSERVATION
ReplyDeleteDILIP PATWARDHAN
common mans helplessness and inability to react is always exploited by the so called nagarsevaks or for that matter all the so called politicians
ReplyDelete