Saturday, December 18, 2010

नविन सायकल घेताय? मग हे जरूर वाचा........

नविन सायकल घेताय मग हे वाचा...
मी गेली तीन वर्षे नियमीत सायकल चालवत आहे आणि सध्या सायकलींना बरे दिवस आले आहेत असे वाटावे एव्ह्ढ्या सायकली पुण्याच्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत.त्यातसुद्धा साधारणपणे मध्यमवयीन स्त्री पुरुषांचे प्रमाण जास्त दिसते.पूर्वी सायकल ही घरात वर्षानुवर्षे वापरली जाणारी गोष्ट होती आणि स्वयंचलीत वाहने कमी असल्यामुळे सायकल हेच कामावर जाणे ,कॉलेजमधे जाणे यांसाठी मुख्य साधन होते.मी कॉलेजमध्ये असताना रॅलेची साधी सायकल मला वडिलांनी दिली होती आणि मला तिने बरीच वर्षे साथ दिली, आणि ती जुनीच होती.
आता तसे नाहीये सायकलचा मुख्यत्वेकरून वापर हा व्यायाम म्हणून होतो पण मग कोणती सायकल घ्यावी असा प्रश्न बह्तेकांना पडतो कारण दुकानात खुप प्रकाराच्या सायकली असतात आणि कोणती घ्यावी हे न कळल्यामुळे आपला खीसा बघून किंवा दुकानदार सांगेल ती सायकल घेतली जाते.
मला असे वाटते की नविन सायकल घेण्यापूर्वी सायकल संबंधी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे ….....
सायकलचा वापर
१. रेस चालवणे किंवा Long distance cycling
२. व्यायाम किंवा फिटनेस करता कोणतीही सायकल चालते
३.कामावर जाण्यासाठी
सायकलचे प्रकार
सायकलचे ४ मुख्य प्रकार आहेत
.माउंटन बाइक



 ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१.जाड आणि रूंद टायर ज्यांचा उपयोग डोगराळ रस्त्यांवर तोल सांभाळण्यासाठी होतो
२.जा्ड फ्रेम
३. दोन्ही किंवा फक्त पुढच्या चाकाला शॉक अबसॉर्बर


.हायब्रीड बाइक

 डांबरी रस्त्यांवर चालविण्यासाठी किंवा ज्याला ऑफ रोड बायकिंग म्हणतात त्यासाठी 
वैशिष्टे
१. वजनाला हलकी
२. मध्यम आकाराचे टायर
.रोड बाइक

 सायकल शर्यतींसाठी किंवा long distance सायकलींग साठी
वैशिष्टे
१. वजनाला अतिषय हलकी
२. पातळ आकाराचे टायर
३. खालच्या बाजूला वळलेले विशीष्ट आकाराचे हॅंडलबार

 ४.रोडस्टर बाइक 



रोडस्टर म्हणजे आपण जी नेहेमी चालवत आलो ती सायकल
वैशिष्टे
 मड्गार्ड, कॅरीअर घंटा लावता येते ,कमी किंमत आणि
मुख्य म्हणजे दणदणीत आणि मजबूत असते .


दुकानात आपल्याला अनेक प्रकारच्या सायकलींचे पर्याय  उपलब्ध असतात आणि बहुतेक दुकानदार सायकल खरेदी करण्यापूर्वी Ride  घेउन देतात आणि सायकल खरेदी करण्यापूर्वी नक्कीच चालवून बघावी.
 
 
सायकल खरेदी करण्यापूर्वी  खाली दिलेल्या वेबसाईटना जरूर भेट द्या
 
 http://www.bikeszone.com
www.cyclists.in/
www.sheldonbrown.com/

3 comments:

  1. उत्तम माहिती चांगल्या प्रकारे मांडली आहे.
    याचा फायदा भरपुर होईल.

    ReplyDelete
  2. संजय सर्वप्रथम तुला धन्यवाद एवढी छान माहिती दिल्याबद्दल. या माहितीचा माझ्यासारख्या नवशिक्याला खूपच फ़ायदा होईल. सोप्या भाषेत तू छानच लिहिले आहेस.
    तु.मंदार,भूपाल,राजू दांडेकर, आपटे व Danny नियमितपणे सायकल चालवता व त्याबद्दलची माहिती फ़ेसबूकवर वाचून मला स्फ़्रूर्ती मिळ्ते. तुझे एका रविवारचे लोणावण्यापर्यंत सायकल चालविल्याचे वाचता वाचताच मला दम लागला व अंगाला डोक्यापासून पायापर्यंत घाम आला. यासाठी तूझे मनापासून जितके कौतूक करावे तेवढे थोडेच. 53 वर्षाच्या वाढदिवसाला भूपालने ५३ कि.मी सायकल चालवली हे वाचून मी थरथरलो.
    बंगी जंपींग करणारे भले तुम्हाला म्हातारे म्हणोत पण तुम्ही सर्वजण तर २५ वर्षाचॆ तरूण वाटता व मुख्य म्हणजे तसे दिसता. KEEP IT UP.
    दिलीप

    ReplyDelete